Friday, June 14, 2024

‘बिग बॉस 16’ फेम अर्चना गौतम एकेकाळी करायची सिलेंडर पोहचवण्याचे काम

अर्चना गौतम ने ‘बिग बॉस 16’ या शो मध्ये प्रेक्षकांचे खूप मनोरंजन केले होते. नुकतेच तिने एका मुलाखतीमध्ये तिच्या बालपणीची एक गोस्ट शेअर केली आहे. त्यात तिने सांगितले आहे कि सन 2007-2008 मध्ये त्यांची कौटुंबिक परिस्थिती हलाखीची होती. त्यात तिने सर्व प्रकारची कामे केली. तिच्या घरी हालाखीची परिस्थिती असल्यामुळे प्रत्येक गोष्टीसाठी तिला खुप संघर्ष करावा लागला. चला तर मग बघुया तिची आतापर्यंतचा प्रवास?

अर्चना (Archana Gautam) घरातली परिस्थिती हलाखीची असताना सिलेंडर डीलीवर करायची त्यातुन तिला 10-20 रुपये मिळायचे. बिग बॉस 16 (Big Boss 16) या शोच्या माध्यमातून ‘अर्चना गौतम’ हि घराघरात पोहोचली. तिने प्रेक्षकांचे खूप मनोरंजन केले होते. तिच्या वागण्या बोलण्यावरून तिचे कौतुकाबरोबर खिल्लीही उडवली गेली. भलेही अर्चना हा शो जिंकू शकली नाही. पण तिचा चाहता वर्ग वाढला. नुकतेच तिने एका इंटरव्यू मध्ये तिचे बालपण खूप गरिबीत गेले असे सांगितले.

अर्चना गौतमचा जन्म उत्तरपरदेश मधील मेरठ येथे झाला. कामासाठी ती मुंबई मधेय शिफ्ट झाली. तिने ‘सेल्स का बाजीगर’ या रियालिटी शोमधून तिची ओळख बनवली. या शो मध्ये तिने सेल्स डिपार्टमेंट कर्मचाऱ्याची भूमिका निभावली होती. तीने परीक्षक रवी किशन यालासुद्धा प्रभावित केले होते. यानंतर तीने मॉडेलिंग आणि अभिनयाच्या विश्वात पदार्पण केले. अर्चनाने सांगितले कि तीने लहान असताना पैसे कमवण्यासाठी रिकामे सिलेंडर पोहोचवण्याचे काम केले.

अर्चनाने पुढे सांगितले कि, तिचा पहिले नोकरी टेलीकॉलिंगची होती. त्या कामासाठी तिला 6000 महिना मिळायचा. तिला इंग्रजी येत नव्हते. त्यामुळे ती हिंदीमध्ये बोलण्याचा प्रयत्न करायची पण, तिचा कॉल कोणीच उचलत नव्हतं, कॉल कट
करायचे. म्हणून तिला कामावरून काढून टाकले. कारण एकही डील झाली नव्हती. त्यानंतर तीने खूप वेगवेगळ्या नोकऱ्या केल्या. नंतर ती सेटल झाले.

यानंतर अर्चना म्हाणाली की, ज्या कंपनीत तिने शेवटी काम केले ती बंद झाली. त्यानंतर ती पुन्हा मेरठला गेली. तिथे तिथे असताना ती रवी किशनच्या शोमध्ये भाग घेण्याची संधी मिळाली. त्यामुळे तिच्या जीवनाला कलाटणी मिळाली. तिचे जीवन पूर्णपणे बदलून गेले. 2014 मध्ये ती मिस उत्तरप्रदेश गौरवण्यात आले होते. त्यानंतर 2018 मध्ये तिला मिस बिकिनी इंडियाचा ‘किताब पटकावला. पुढे तिला बिग बॉस 16 या शो च्या माध्यमातून ओळखले जाऊ लागले. या शो मध्ये ती थर्ड रनर अप राहिली आणि रॅपर एमसी स्टॅन या शो चा विजेता ठरला. (big-boss-16-runner-up-archana gauatam-share-her-childhood-story-in-interview)

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
आईच्या सांगण्यावरून साईन केला ‘हा’ चित्रपट; करिश्माने केला मोठा खुलासा
आधीच अफेअरच्या चर्चा, त्यात सोशल मीडियावर पोस्ट करत ‘अनन्याने’ माजवली खळबळ; एकदा वाचाच

हे देखील वाचा