[rank_math_breadcrumb]

‘बाळासाहेबांनी मला घरी बोलावलं आणि’… अभिजित सावंतने सांगितला तो किस्सा

बिग बॉस मराठीच्या पाचव्या सिझन मध्ये सध्या अभिजीत सावंत चर्चेत आहे. गेल्या काही दिवसांपासून अभिजीत वेगवेगळ्या कारणांमुळे चर्चेचा विषय बनला आहे. मग त्याचं अरबाझ आणि निक्की यांच्या मध्ये येणं असो किंवा त्याच्या पत्नीने त्याला सोशल मिडीयावर सपोर्ट करणे असो. आता तो एका मुलाखतीमुळे चर्चेत आला आहे. ज्यामध्ये त्याने त्याच्या अनेक आठवणींचा तसेच खाजगी गोष्टींचा खुलासा केला आहे. 

नुकत्याच झालेल्या एका मुलाखतीत अभिजितने स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या सोबतचा एक जुना किस्सा सांगितला आहे. तो म्हणाला कि, बाळासाहेबांनी मला घरी बोलावलं होतं. त्यावेळी मी मातोश्री वर गेलो होतो. बाळासाहेबांना कलाकारांविषयी खूप प्रेम आणि आदर होता. त्यांच्या घराच्या वरच्या माळ्यावर आम्ही बसलो होतो. त्यावेळी त्यांनी मला काही गोष्टी सांगितल्या काय केलं पाहिजे काय नाही केलं पाहिजे याविषयी उपदेश दिले. त्यांनी माझ्या पूर्ण कुटुंबाला आमंत्रण दिलं होतं. संपूर्ण ठाकरे कुटुंबाला माझ्यासमोर उभं करून माझी ओळख करून दिली होती. आम्ही ज्यांना मत द्यायचो ज्यांना तारणहार समजायचो ते संपूर्ण महाराष्ट्राचं भलं करणारे आणि आमच्या आवडीचे नेते ओळख करून देत होते. हा एक वेगळाच अनुभ होता. 

या मुलाखतीत अभिजितने त्याच्या राजकीय अनुभवाविषयी सुद्धा सांगितले. तो म्हणाला, मी शिवसेनेत प्रवेश केला होता. मला ते सर्व लोक आवडायचे सुद्धा विशेष म्हणजे आदित्य ठाकरे. त्यावेळेला तो समविचारी माणूस वाटायचा. कारण तो तरुण होता. कविता करायचा. त्याला कलेची जाण होती. त्याच्यासोबत बसले कि कळायचे कि तो एक वेगळा व्यक्ती आहे. लहान आहे पण त्याला खूप ज्ञान आहे. त्याचं बोलणं खूप परीपक्क्व वाटायचं. त्यामुळे त्याच्यासोबत मजा यायची.

मी धारावीत राहायचो. संपूर्ण आयुष्य तिथेच गेले. तिथल्या समस्या मी जवळून पहिल्या होत्या. म्हणून मला वाटायचे की ज्या लोकांनी इतकं प्रेम दिलंय. माझ्यासाठी एवढं केलंय त्यांच्यासाठी मी पण काहीतरी चांगलं करू शकतो. असं जर झालं तर मला एक समाधान मिळेल. पण नंतर मला एक गोष्ट लक्षात आली ती म्हणजे इथे समाजसेवेपेक्षा राजकारणच जास्त चालते. त्यामुळे पुढे मला वाटले की आपला कामधंदा बरा. म्हणून मी राजकारणातून बाहेर पडलो मी खूप चांगल्या लोकांना भेटलो. त्यांच्याकडून खूप काही शिकलो.वाईट लोकांकडूनही चांगल्या गोष्टी शिकलो. त्यामुळेच मी शिकत राहण्याच्या नेहमी प्रयत्न करतो. 

दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा 

हेही वाचा –

‘इमर्जन्सी’ला सेन्सॉर बोर्डाकडून मिळाला नाही ग्रीन सिग्नल, कंगना राणौतने रिलीजच्या अटकेवर मोठा खुलासा

author avatar
Tejswini Patil