Monday, October 2, 2023

काळीज तोडणारी बातमी! 40 वर्षीय गायकाच्या 3 मुली झाल्या पोरक्या, संगीतविश्वावर शोककळा

संगीतसृष्टीतून काळीज तोडणारी बातमी समोर येत आहे. हरियाणवी गायक राजू पंजाबी याचे निधन झाले. राजूने मंगळवारी (दि. 22 ऑगस्ट) पहाटे 4 वाजता अखेरचा श्वास घेतला. तो फक्त 40 वर्षांचा होता. राजू मागील काही दिवसांपासून आजारी होता. हाती आलेल्या वृत्तांनुसार, त्याला हिसारच्या खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तिथेच त्याच्यावर उपचार सुरू होते. असे म्हटले जात आहे की, त्याच्या यकृत आणि फुफ्फुसात संसर्ग झाला होता. तब्येत बिघडल्यामुळे तो कालपासूनच व्हेंटिलेटरवर होता. अशात त्याच्या निधनामुळे कलाविश्वावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. त्याच्या निधनावर चाहत्यांसोबतच कलाकारही शोक व्यक्त करत आहेत.

राजू पंजाबी (Raju Punjabi) याच्या निधनामुळे हरियाणवी संगीतसृष्टी सध्या शोकसागरात आहे. इंडस्ट्रीत त्याच्यासोबत काम करणाऱ्या अनेक कलाकारांनी हे वैयक्तिक नुकसान असल्याचे म्हटले आहे. यामध्ये प्रदीप बुरा आणि पूजा हुड्डा यांसारख्या कलाकारांचा समावेश आहे. राजू मागील काही दिवसांपासून आजारी होता. त्याच्यावर एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते. असे म्हटले जात आहे की, राजूवर त्याच्या रावतसर या गावात अंत्यसंस्कार होणार आहेत.

राजूला कावीळ झाली होता. त्यानंतर त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, उपचारादरम्यान त्याची तब्येत सुधारली होती आणि त्याला घरीदेखील सोडण्यात आले होते. मात्र, त्याची तब्येत अचानक बिघडली आणि त्याला पुन्हा रुग्णालयात दाखल करावे लागले होते.

राजूची प्रसिद्ध गाणी
राजू हिसारच्या आझादनगरमध्ये राहत होता. आता राजूच्या निधनानंतर (Raju Punjabi Death) त्याच्या घरी नातेवाईक येत आहेत. राजू विवाहित होता. त्याला 3 मुली आहेत. राजू हरियाणा, पंजाब आणि राजस्थानमधील संगीतसृष्टीतील प्रसिद्ध चेहरा होता. त्याच्या प्रसिद्ध गाण्यांमध्ये ‘सॉलिड बॉडी’, ‘सँडल’, ‘तू चीज लाजवाब’, ‘देसी-देसी’ यांसारख्या गाण्यांचा समावेश आहे.

सपना चौधरीसोबत हिट होती जोडी
राजू पंजाबी याने अनेक सुपरहिट गाणी दिली होती. हरियाणवी ‘डान्सर क्वीन’ सपना चौधरी हिच्यासोबत त्याची जोडी चाहत्यांमध्ये विशेष प्रसिद्ध होती. तो हरियाणवी संगीतविश्वातील मोठ्या कलाकारांमध्ये गणला जात होता. ‘देसी-देसी ना बोल्याकर’ या गाण्यामुळे राजूने उत्तर भारतात जबरदस्त प्रसिद्धी मिळवली होती. मात्र, आता त्याच्या निधनामुळे संगीतविश्वाचे मोठे नुकसान झाले आहे.

महत्त्वाच्या बातम्या-
सनीच्या ‘Gadar 2’चा बॉक्स ऑफिसवर ‘हातोडा’, 400 कोटींच्या क्लबमध्ये एन्ट्री करण्यासाठी हवेत ‘फक्त’ एवढे रुपये
Juhu Bungalow प्रकरणी सनी देओल स्पष्टच बोलला; म्हणाला, ‘मी काही बोललो तर…’

हे देखील वाचा