Thursday, November 7, 2024
Home बॉलीवूड सनीच्या ‘Gadar 2’चा बॉक्स ऑफिसवर ‘हातोडा’, 400 कोटींच्या क्लबमध्ये एन्ट्री करण्यासाठी हवेत ‘फक्त’ एवढे रुपये

सनीच्या ‘Gadar 2’चा बॉक्स ऑफिसवर ‘हातोडा’, 400 कोटींच्या क्लबमध्ये एन्ट्री करण्यासाठी हवेत ‘फक्त’ एवढे रुपये

अभिनेता सनी देओल याचा ‘गदर 2‘ सिनेमा रिलीज होऊन दोन आठवडे उलटले आहेत. मात्र, अजूनही बॉक्स ऑफिसवर थांबायचं नाव घेत नाहीये. वीकडेलाही सिनेमा बक्कळ कमाई करत आहे. ‘गदर 2’ सिनेमा आता 400 कोटी रुपयांच्या क्लबमध्ये एन्ट्री करण्यासाठी सज्ज झाला आहे. ‘तारा सिंग‘ आणि ‘सकीना’ यांची केमिस्ट्री यावेळीही प्रेक्षकांची मने जिंकण्यात यशस्वी झाली. अशात ‘गदर 2’ सिनेमाच्या 11व्या दिवसाची कमाई समोर आली आहे. ही आकडेवारी पाहून चाहत्यांच्याही भुवया उंचावल्या आहेत.

‘गदर 2’ (Gadar 2) सिनेमाला 300 कोटींच्या क्लबमध्ये सामील होण्यासाठी जास्त वेळ लागला नव्हता. दुसऱ्या वीकेंडपूर्वीच सिनेमाने ही कामगिरी केली होती. 8 दिवसात सिनेमाने 300 कोटींचा आकडा पार केला होता. बॉलिवूडमध्ये दीर्घ काळानंतर कोणताही सिनेमा अशाप्रकारे हिट होताना पाहायला मिळाला. दररोज कमाईचे वाढते आकडे सर्वांनाच हैराण करत आहेत.

सिनेमाने 11व्या दिवशी किती छापले?
सनी देओलच्या या सिनेमाच्या 11व्या दिवसाची कमाई समोर आली आहे. सिनेमाच्या निर्मात्यांनीही इंस्टाग्रामवर पोस्ट शेअर करत कमाईविषयी सांगितेल आहे. झी स्टु़ुडिओजच्या पोस्टनुसार, ‘गदर 2’ने रिलीजच्या 11व्या दिवशी 13.50 कोटी रुपयांची कमाई केली आहे. यानंतर सिनेमाची एकूण कमाई 388.60 कोटी रुपये झाली आहे. आता हा सिनेमा लवकरच 400 कोटी रुपयांचा आकडा पार करेल, अशी आशा व्यक्त केली जात आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Zee Studios (@zeestudiosofficial)

पहिल्या आठवड्यात किती केलेली कमाई?
‘गदर 2’ सिनेमाच्या कलेक्शनविषयी बोलायचं झालं, तर सिनेमाने पहिल्या आठवड्यात 284.63 कोटी रुपये कमावले होते. सिनेमाने 15 ऑगस्ट रोजी सर्वाधिक कमाई केली होती. ‘गदर 2’ सिनेमा 15 ऑगस्ट रोजी 55.40 कोटी रुपये कमावण्यात यशस्वी झाला होता. यामुळे अनेक विक्रम मोडले गेले होते.

‘गदर 2’ सिनेमाविषयी बोलायचं झालं, तर हा 2001मध्ये रिलीज झालेल्या ‘गदर: एक प्रेम कथा’ या सिनेमाचा सीक्वल आहे. या सिनेमाचे दिग्दर्शन अनिल शर्मा यांनी केले आहे. या सिनेमात सनी देओल आणि अमीषा पटेल यांच्यासोबतच उत्कर्ष शर्मा आणि मनीष वाधवा यांच्याही मुख्य भूमिका आहेत. (sunny deol film gadar 2 box office collection day 11 earns 13.50 crore closed to entered in 400 crore club)

महत्त्वाच्या बातम्या-
Juhu Bungalow प्रकरणी सनी देओल स्पष्टच बोलला; म्हणाला, ‘मी काही बोललो तर…’
…म्हणून मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या पाया पडले रजनीकांत, स्वत:च केला खुलासा

author avatar
Team Bombabomb

हे देखील वाचा