Tuesday, September 26, 2023

Juhu Bungalow प्रकरणी सनी देओल स्पष्टच बोलला; म्हणाला, ‘मी काही बोललो तर…’

ब्लॉकबस्टर सिनेमांच्या यादीत विराजमान होत असलेला ‘गदर 2‘ सिनेमा चांगलाच चर्चेत आहे. तसेच, सिनेमातील मुख्य अभिनेता सनी देओल हादेखील या सिनेमामुळे तितकाच चर्चेचा आहे. हा सिनेमा नवनवे विक्रम मोडत आहे. ‘गदर 2’ 400 कोटी रुपयांच्या क्लबमध्ये सामील होण्यासाठी सज्ज झाला आहे. एकीकडे कलाकार सिनेमाच्या यशाचा जल्लोष साजरा करत असतानाच हैराण करणारी बातमी समोर आली. ती अशी की, सनी देओल याला जुहू बंगल्याच्या लिलावाची नोटीस मिळाली. ही नोटीस बँक ऑफ बडोदाने वृत्तपत्रात दिली. हाती आलेल्या माहितीनुसार, सनीचा जुहू बंगला 55 कोटी रुपयांच्या कर्जाखाली दबला आहे. मात्र, आता बँकेने लिलावाची नोटीस मागे घेतली आहे. अशात यावर सनीची प्रतिक्रिया समोर आली आहे. अभिनेता आणि भारतीय जनता पक्षाचा खासदार सनीने म्हटले आहे की, ही त्याची खासगी बाब आहे.

काय म्हणाला सनी देओल?
यादरम्यान सनी देओल (Sunny Deol) म्हणाला की, “मला कोणतेही वक्तव्य करायचे नाहीये. ही माझी खासगी बाब आहे. मी काहीही बोललो, तर लोक त्याचा चुकीचा अर्थ काढतील.”

खरं तर, सरकारी मालकीच्या बँकेने रविवारी (दि. 20 ऑगस्ट) सनी देओलचा जुहू बंगला (Sunny Deol Juhu Bungalow) लिलावासाठी काढला होता. कारण, अभिनेत्याने डिसेंबर 2022पासून 55.99 कोटी रुपयांचे कर्ज फेडले नव्हते. मात्र, सोमवारी बँकेने तांत्रिक कारणाचा हवाला देत नोटिस मागे घेतली आहे. सनी देओलने बँकेकडून कर्ज घेतले होते. तसेच, त्याचा भाऊ बॉबी देओल आणि वडील धर्मेंद्र याचे जामीनदार होते. याव्यतिरिक्त सनी साऊंड्स प्रायव्हेट लिमिटेड तारण ठेवण्यासाठी कार्पोरेट हमीदार होता.

‘गदर 2’ सुपरहिट
अलीकडेच रिलीज झालेला सनी देओल याचा सिनेमा ‘गदर 2’ (Gadar 2) बॉक्स ऑफिसवर यशस्वी कामगिरी करत आहे. या सिनेमाने पहिल्या आठवड्यात शानदार कमाई केली आहे. हा सिनेमा 80 कोटी रुपयांच्या बजेटमध्ये बनला आहे. कमाईच्या बाबतीत ‘गदर 2’ हा शाहरुख खान (Shahrukh Khan) याच्या ‘पठाण’ सिनेमानंतर दुसरा सर्वाधिक कमाई करणारा सिनेमा बनला आहे. हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर जबरदस्त कमाई करत आहे. सिनेमाने रिलीजच्या 10 दिवसांनंतर 370 कोटी रुपयांच्या कमाईचा टप्पाही पार केला आहे. सध्या या सिनेमाने अनेक विक्रम मोडले आहेत. अशात आगामी दिवसांमध्ये हा सिनेमा काय कमाल करतो, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल. (actor sunny deol reaction on juhu bungalow actor said i do not want to comment)

महत्त्वाच्या बातम्या-
…म्हणून मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या पाया पडले रजनीकांत, स्वत:च केला खुलासा
पहिल्याच चित्रपटाने ‘या’ अभिनेत्रीला मिळालेली ओळख, पण पतीमुळे झाला करिअरचा सत्यानाश

हे देखील वाचा