Sunday, April 14, 2024

दु:खद! Heart Attackमुळे ‘या’ अभिनेत्याचे 25व्या वर्षी निधन, मुंबईतील राहत्या घरी घेतला अखेरचा श्वास

कलाविश्वातून काळीज तोडणारी बातमी समोर येत आहे. अभिनेता पवन याचे शुक्रवारी (दि. 18 ऑगस्ट) पहाटे 5च्या सुमारास निधन झाले. तो अवघ्या 25 वर्षांचा होता. त्याने मुंबईतील राहत्या घरी अखेरचा श्वास घेतला. त्याच्या निधनामुळे कलाविश्वावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. पवनने तमिळव्यतिरिक्त हिंदी टीव्ही मालिकांमध्येही अभिनयाचा डंका वाजवला होता.

अभिनेता पवन (Pawan) हा कर्नाटकच्या मांडवा येथील रहिवासी होता. माध्यमांतील वृत्तांनुसार, अंत्यसंस्कार करण्यासाठी त्याचे पार्थिव मंबईहून मांडवाला आणले जाईल. मांडवा येथेच त्याच्यावर अंत्यसंस्कार होतील. असेही सांगण्यात आले आहे की, पवन कामामुळे कुटुंबासोबत मुंबईत राहायचा. त्याने अनेक हिंदी आणि तमिळ टीव्ही शोमध्ये काम केले आहे.

अभिनेत्याच्या निधनावर चाहत्यांसोबतच कर्नाटकची नेते मंडळी आणि अभिनेत्यांनी शोक व्यक्त केला आहे. मात्र, हृदयविकाराच्या झटक्यामुळे कोणत्याही अभिनेत्याचे निधन होण्याची ही पहिलीच वेळ नाहीये. यापूर्वी अनेक कलाकारांना यामुळे कमी वयात जगाचा निरोप घ्यावा लागला आहे. त्यात अभिनेता पुनीत राजकुमार आणि चिरंजीवी सर्जा यांच्या नावाचाही समावेश आहे. (shocking hindi and tamil tv actor pawan passed away due to heart attack at his residence in mumbai read)

महत्त्वाच्या बातम्या-
तो आला…त्याने गायले…आणि तो जिंकला, अमिताभ बच्चन यांच्या एका फोनने बदलवून टाकले दलेर मेहंदींचे आयुष्य
नाद नाद नादच! रिलीजच्या 3 आठवड्यांनंतर आलिया-रणवीरच्या सिनेमाला यश; किती कोटी छापले वाचाच

हे देखील वाचा