Monday, July 1, 2024

काय सांगता! चित्रपटातील गाणी हिट होण्यासाठी शो मॅन राज कपूर घ्यायचे किन्नरांची मदत? खोटे वाटते मग वाचा ‘हा’ किस्सा

बॉलिवूडमध्ये कपूर घराण्याचे योगदान खूपच मोठे आणि वाखाणण्याजोगे आहे. पृथ्वीराज कपूर (prithviraj kapoor) यांच्यापासून सुरु झालेला हा वारसा आज करिना कपूरपर्यंत (kareena kapoor) अविरत चालू आहे. पृथ्वीराज कपूर यांनी घातलेल्या पायाला कळस चढवण्याचे काम शो मॅन राज कपूर यांनी केले. एक उत्तम अभिनेता असलेले राज कपूर उत्तम दिग्दर्शक देखील होते. हिंदी सिनेसृष्टीला अतिशय सुंदर सिनेमे त्यांनी दिले आहेत. ही चित्रपटसृष्टी पुढे आणण्यामध्ये राज कपूर (raj kapoor) यांचा सिंहाचा वाटा आहे. सिनेसृष्टीला शिखरावर पोचवणारे आणि त्यांच्या तिसऱ्या डोळ्यातून सर्वोत्कृष्ट कलाकृती तयार करणारे राज कपूर अंधविश्वासू होते. ऐकून थोडे विचित्र वाटले ना? मात्र ही गोष्ट खरी आहे. आर. के. बॅनर खाली अनेक सुपरहिट सिनेमे देणाऱ्या राज कपूर यांनी त्यांच्या सिनेमातील गाणी हिट होण्यासाठी एक आगळी वेगळी शक्कल लढवली होती.

त्याकाळची राज कपूर आणि त्यांच्या पार्ट्यांची चर्चा इंडस्ट्रीसोबत मीडिया आणि लोकांमध्ये देखील भरपूर व्हायची. त्यांच्या घरी नेहमीच कोणत्या ना कोणत्या पार्ट्या चालायच्या. त्यांच्या सर्व पार्ट्यांमध्ये होळी पार्टी विशेष प्रसिद्ध होती. या पार्टीला संपूर्ण बॉलिवूड यायचे. ही होळी पार्टी आर. के. स्टुडीमध्ये व्हायची. वाचून थोडे आश्चर्य वाटेल की, या पार्टीला राज कपूर किन्नर लोकांना देखील आमंत्रित करायचे. पार्टी संपायच्या काही काळ आधी किन्नर या पार्टीत यायचे आणि खूपच मजामस्ती करत होळी खेळायचे.

सर्वात शेवट राज कपूर या किन्नरांना त्यांच्या आगामी चित्रपटातील गाणी ऐकवायचे, आणि त्यांना गाणे आवडले का विचारायचे. जर एखादे गाणे किन्नरांना आवडले तरच ते चित्रपटात राहायचे अन्यथा राज कपूर ते गाणे चित्रपटातून काढून टाकायचे. याचा एक किस्सा राज कपूर यांच्या ‘राम ‘तेरी गंगा मैली’ या चित्रपटाच्या वेळेस घडला होता. या चित्रपटातील एक गाणे राज कपूर यांनी किन्नरांना ऐकवले, आणि ते गाणे एकल्यावर किन्नरांनी गाणे रिजेक्ट केले. त्यामुळे राज कपूर यांनी दुसरे गाणे तयार केले. हे गाणे होते रवींद्र जैन यांचे ‘सून सायबा सून’. हे गाणे जेव्हा किन्नरांना ऐकवले तेव्हा ते म्हणाले, हे गाणे पुढची अनेक वर्ष लोकांच्या तोंडावर रेंगाळेल, आणि असेच झाले. आजही हे गाणे तितक्याच उत्साहाने ऐकले जाते.

राज कपूर हे त्यांच्या भव्य चित्रपटांसाठी ओळखले जायचे. त्यांनी त्यांच्या कारकिर्दीत अनेक हिट सिनेमे दिले. त्यांना ३ राष्ट्रीय ११ फिल्मफेयर पुरस्कारांनी गौरवण्यात आले.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

हेही नक्की वाचा-

हे देखील वाचा