Tuesday, April 23, 2024

श्रद्धा कपूरने दिली राहुल मोदींसोबतच्या नात्याची हिंट, अभिनेत्रीच्या गळ्यातील लॉकेट पाहून चर्चांना आले उधाण

अभिनेता शक्ती कपूरची लाडकी मुलगी श्रद्धा कपूरने (Shraddha Kapoor)  तिच्या करिअरच्या सुरुवातीला ‘तीन पत्ती’ आणि ‘लव्ह का द एंड’ सारखे सिनेमे केले, मात्र ‘आशिकी 2’ या चित्रपटातून तिला यश मिळाले. या चित्रपटाने तिच्या करिअरची स्थिती आणि दिशा बदलली हे स्वत: श्रद्धा कपूर मान्य करते. आता अलीकडेच, अभिनेत्रीचा एक फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे,

अलीकडेच जामनगरमध्ये अनंत अंबानी आणि राधिका मर्चंटच्या प्री-वेडिंग सेलिब्रेशनमध्ये श्रद्धा आणि राहुल एकत्र दिसले होते. तेव्हापासून दोघांच्या नात्याच्या अफवा पसरल्या होत्या. आता श्रद्धा कपूरने तिचे काही फोटो शेअर केले आहेत, ज्यात तिने ‘आर’ नेक पीस घातला आहे. हे फोटो पाहिल्यानंतर चाहते श्रद्धा आणि राहुलच्या नात्याचा अंदाज लावत आहेत.

श्रद्धा कपूरचे नाव ‘तू झूठी मैं मक्कर’चे लेखक राहुल मोदी यांच्यासोबत बऱ्याच दिवसांपासून जोडले जात होते, परंतु या जोडप्याने काहीही दिली नव्हती. दरम्यान, अलीकडेच श्रद्धा कपूरने तिचे काही फोटो इंस्टाग्रामवर शेअर केले आहेत, जे पाहून असे दिसते आहे की अभिनेत्री पुष्टी करू इच्छित आहे. इतकेच नाही तर सोशल मीडियावर चाहते श्रद्धा कपूरसोबतच्या तिच्या नात्याबद्दल अनेक प्रश्न विचारत आहेत. मात्र, या वृत्तांवर अभिनेत्रीने अद्याप कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही.

श्रद्धाच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाले तर, या वर्षात श्रद्धा कपूरकडे अनेक चित्रपट आहेत. यामध्ये कार्तिक आर्यनसोबतचा ‘चंदू चॅम्पियन’ देखील समाविष्ट आहे, जो जूनमध्ये रिलीज होण्याची शक्यता आहे. त्याच वेळी, सुपरहिट हॉरर कॉमेडी चित्रपट स्त्रीचा सिक्वेल देखील यावर्षी रिलीजसाठी सज्ज आहे. ‘स्त्री 2’ 30 ऑगस्टला रिलीज होणार आहे. याशिवाय अनुराग बासूच्या चित्रपटातही श्रद्धा दिसणार आहे.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

हेही वाचा-

लोकसभा निवडणूक लढण्यापूर्वी भावूक झाली कंगना; म्हणाली, ‘मातृभूमीची सेवा करणे हे माझे भाग्य आहे’
केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांची ‘स्वातंत्र्यवीर सावरकर’च्या स्क्रीनिंगला हजेरी, चित्रपटाबाबत केले हे वक्तव्य

हे देखील वाचा