अल्लू अर्जुनच्या ‘पुष्पा’ या चित्रपटाने सर्वत्र नाव कमावले आहे. अनेक भाषांमध्ये हा चित्रपट प्रदर्शित झाला आहे. चित्रपटाला प्रेक्षकांचा खूप चांगला प्रतिसाद मिळत आहे. अल्लू अर्जुनाचा चित्रपटातील लूक देखील सगळ्यांना खूप आवडला आहे. हा चित्रपट हिंदीमध्ये देखील प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटाला अनेक हिंदी कलाकारांनी त्यांचा आवाज दिला आहे. अशातच अल्लू अर्जुनच्या पात्राला हिंदीमध्ये अभिनेता श्रेयश तळपदे याने आवाज दिला आहे. त्यामुळे त्याचे सर्वत्र कौतुक होत आहे.
श्रेयश (shreysh talpade) सध्या झी मराठीवरील ‘माझी तुझी रेशीमगाठ’ या मालिकेत काम करत आहे. मालिकेत तो यश नावाच्या मुख्य भूमिकेत आहे. त्याचे हे पात्र देखील अनेकांना खूप आवडत आहे. सगळेजण त्याचे कौतुक करत आहेत. अनेक मालिकांना मागे सारत ही मालिका प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत आहे. मालिकेत त्याच्यासोबत प्रार्थना बेहरे (prarthana behere) मुख्य भूमिकेत आहे. त्यांची जोडी सगळ्यांना खूप आवडत आहे. अशातच मालिकेत अजून एक असे पात्र आहे. ज्या पात्राने सगळ्यांना आकर्षित केले आहे. तर म्हणजे बाल कलाकाराच्या भूमिकेत असणारी परी म्हणजेच मायरा वैकुळ (myra vaikul) होय. तिचे सर्वत्र खूप गाजत आहे. (shreyash talpade and myra vaikul’s video viral on social media)
अशातच श्रेयश आणि मायरा ‘पुष्पा’ (pushpa) चित्रपटातील एक डायलॉग म्हणताना दिसत आहे. हा व्हिडिओ मायराच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे. ते दोघेही अल्लू अर्जुनप्रमाणे (allu arjun) हावभाव करत आहे. ते दोघेही ‘झुकेगा नही’ हा डायलॉग म्हणत आहे. त्यांचा हा व्हिडिओ सगळ्यांना खूप आवडत आहे. अनेकजण या व्हिडिओवर त्यांच्या प्रतिक्रिया देत आहेत. तसेच चित्रपटाची त्याचा आवाज देखील अनेकांना आवडला आहे.
श्रेयसने अनेक मराठी तसेच हिंदी चित्रपटात काम केले आहे. त्याने अनेक वर्षांनी टेलिव्हिजनवर पुरागमन केले आहे. त्याची सध्या चालू असलेली मालिका देखील खूप गाजत आहे.
हेही वाचा :