Monday, July 1, 2024

‘मराठी कलाकारांना हिंदी कलाकार घाबरतात’, श्रेयस तळपदेचे विधान चर्चेत

तरुणींच्या मनावर अधिराज्य गाजवणारा मराठी सिनेसृष्टीतील लोकप्रिय अभिनेता म्हणजे श्रेयस तळपदे. (Shreyash Talpade) श्रेयस आगामी चित्रपट ‘ही अनोखी गाठ’मुळे सध्या चर्चेत आला आहे. राठी बरोबरच हिंदी चित्रपटांमध्ये श्रेयसने आपल्या अभिनयाचा ठसा उमटवला आहे. त्यामुळे त्याला मराठी सिनेसृष्टीसह हिंदी सिनेसृष्टीचा चांगलाच अनुभव आहे. अशातच एका मुलाखतीदरम्यान श्रेयसने केलेल्या विधानामुळं त्याच्या चाहत्यांच्या भुवया उंचावल्या.

काही दिवसांपूर्वी श्रेयसने मराठी व हिंदी चित्रपटसृष्टीतील नेपोटिझमवर भाष्य केले होते. आता त्यानं मराठी कलाकारांना हिंदी कलाकार घाबरतात असं विधान केलं आहे. त्यामागचे कारणदेखील श्रेयसने स्पष्ट केलं आहे.
एका मुलाखतीमध्ये श्रेयसला मराठी कलाकारांना हिंदी कलाकार खरंच घाबरतात का? असा सवाल केला असता, ‘ मराठीतील अनेक कलाकारांच्या मागे नाटकांची पार्श्वभूमी आहे. त्यामुळे ती व्यक्ती कलाकार म्हणून कसलेली असते. त्यामुळे हिंदी कलाकारांना वाटतं की, मराठी कलाकारांबरोबर सीन करताना आपणही तेवढंच सतर्क रहावं. त्यामुळे हिंदी चित्रपटसृष्टीत मराठी कलाकारांना मान असतो, तसेच मराठी कलाकारांना हिंदी कलाकार घाबरूनपण असतात.’ असं स्पष्टीकरण श्रेयसने यावेळी दिले.

यापूर्वीही, मराठी व हिंदी चित्रपटसृष्टीतील नेपोटिझमवर भाष्य केले होते. ज्यांना आपण स्टार किड्स म्हणतो, त्यांच्यासाठी काही गोष्टी नक्कीच सोप्या असतात. आपल्यासमोर याची काही जिवंत उदाहरणे आहेत. मराठीमध्ये नेपोटिझमचे प्रमाण कमी आहे, पण स्टार किड्ससाठी चित्रपटात येण्याचा मार्ग सोप्पा असतो. स्टार किड्स असो अथवा नसो, त्याला केवढा मोठा करायचा हे प्रेक्षकच ठरवत असतात. त्यामुळे मला या गोष्टीचा कधीच राग नाही आला किंवा मी त्याचा एवढा विचारही करत नाही. कारण मी त्यावर लक्ष केंद्रित केले तर त्याचा माझ्या कामावर परिणाम होईल. अशा कडक शब्दात श्रेयस नेपोटिझमवर श्रेयस तळपदे बोलला.

काही दिवसांपूर्वीच श्रेयसला हृदयविकाराचा झटका आला होता. मुंबईतील नामांकित रुग्णालयात त्याला दाखल करण्यात आले होते. आता श्रेयसच्या तब्येतीत हळूहळू सुधारणा होत असून, त्याने कामावर कमबॅक केले आहे.
श्रेयसच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाल्यास, ओम शांती ओम, हाऊसफुल्ल २, इक्बाल यांसारख्या हिंदी चित्रपटांमधील त्याच्या भूमिका चांगल्याच गाजल्या. माझी तुझी रेशीमगाठ या मालिकेतून त्याने मराठी टेलिव्हिजनसृष्टीत पदार्पण केले. या मालिकेला प्रेक्षकांचा भरभरून प्रतिसाद मिळाला. आता त्याचा अनोखी गाठ हा मराठी चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. १ मार्च रोजी हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

हेही वाचा-

रकुल- जॅकीच्या लग्नातील अनसीन व्हिडिओ समोर, समुद्रात मस्ती करताना दिसले नवविवाहित जोडपे
Janhvi Kapoor: ‘मला स्वतःचीच लाज वाटते’, देवरा शुटींगदरम्यान जान्हवी कपूर असं का म्हणाली?

हे देखील वाचा