Thursday, April 18, 2024

रकुल- जॅकीच्या लग्नातील अनसीन व्हिडिओ समोर, समुद्रात मस्ती करताना दिसले नवविवाहित जोडपे

बॉलिवूड अभिनेत्री रकुल प्रीत सिंग (Rakul preet singh) आणि जॅकी भगनानी (jackie bhagnani) यांनी लग्न केले आहे. दोघांनी 21 फेब्रुवारी रोजी गोव्यात त्यांचे कुटुंब आणि काही खास मित्रांमध्ये सात फेरे घेतले आहे. ड्रीम बीच लग्नाचे फोटो आणि लग्नाच्या सर्व फंक्शन्सची झलक पाहण्यासाठी चाहते उत्सुक आहेत. लग्नाच्या काही फोटोनंतर आता रकुल आणि जॅकीच्या लग्नाचा एक व्हिडिओ समोर आला आहे, ज्यामध्ये हळदी आणि संगीताच्या धूमधडाक्यापासून ते गमती-जमती आणि त्यादरम्यानची मजा, या जोडप्याने या क्षणाचा किती आनंद लुटला हे दिसून येते.

रकुल प्रीत सिंग आणि जॅकी भगनानी यांच्या लग्नाच्या फोटोनंतर, गोव्यातील मोठ्या लग्नाची झलक देणारा एक व्हिडिओ समोर आला आहे. या व्हिडीओमध्ये तुम्हाला हळदी, संगीत, मेहंदी आणि पेहराव यांच्यासोबत लग्नात झालेल्या धमाल मस्तीची झलक पाहायला मिळणार आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Rakul Singh (@rakulpreet)

 

लग्नाचे सर्व विधी पूर्ण केल्यानंतर रकुल प्रीत सिंग आणि जॅकी भगनानी यांनी त्यांच्या लग्नाचा एक छोटासा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये लग्नाची मेहंदी, हळदी, संगीत आणि फेरे दिसत आहेत. या व्हिडिओच्या सुरुवातीला नववधू रकुल प्रीत तिच्या वराकडे नाचताना दिसत आहे आणि जॅकीही आपल्या वधूला पाहून नाचू लागतो. दोघेही एकमेकांना मिठी मारतात. मग ते एकमेकांना हार घालताना दिसत आहेत.

यसीबतच लग्नाआधीच्या फंक्शन्स, हळदी आणि संगीत सोहळ्याची अप्रतिम झलकही पाहायला मिळते. याशिवाय व्हिडिओमध्ये दोघेही समुद्रात मस्ती करताना दिसत आहेत. या व्हिडिओसोबतच्या कॅप्शनमध्ये जोडप्याने लिहिले आहे की, हे तुम्ही आणि मी नाही तर आम्ही आहोत. #bintere #abdonobhagna-ni.

दोघांनी दोन रितीरिवाजानुसार लग्न केले. दोघांनी आधी शीख आणि नंतर सिंधी पद्धतीने लग्न केले. सेलिब्रिटींसोबतच चाहत्यांनीही त्याचा हा व्हिडिओ लाइक करत अभिनंदन केले आहे.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

हेही वाचा-

‘ही’ बॉलीवूड अभिनेत्री आहे मनोहर जोशींची नात; विकी कौशिलसोबत आहे खास कनेक्शन?
Jaya Bachchan : ‘माझं ते स्वप्न अपूर्णच…’ वयाच्या ७५ व्या वर्षी जया बच्चन यांनी व्यक्त केली खंत

हे देखील वाचा