बॉलिवूडमध्ये काम करण्यासाठी प्रत्येक कलाकाराला स्ट्रगल करावा लागतो. काही असे देखील कलाकार आहेत ज्यांना आपल्या अभिनयाचा वारसा आपल्या कुटुंबातून लाभला आहे, तर काही असे आहेत की जे स्वकर्तुत्वाने यशाची पायरी चढले आहेत. याशिवाय काही असेदेखील कलाकार आहेत ज्यांनी आपल्या पालकांच्या पावलांवर पाऊल ठेवत आपले नशीब आजमावले आहे. यापैकी एक अभिनेत्री म्हणजेच सुप्रिया पिळगावकर व अभिनेता सचिन पिळगावकर यांची एकुलती एक कन्या श्रिया पिळगावकर.
श्रिया आपल्या आईवडिलांच्या पावलावर पाऊल ठेवत आज एक उत्तम अभिनेत्री म्हणून नावारूपास आली आहे. केवळ मराठी चित्रपटसृष्टी नव्हे, तर आपल्या कारकिर्दीच्या फार कमी कालावधीत हिंदी चित्रपटसृष्टीत आपले पाय रोवले आहेत. अभिनेत्रीप्रमाणेच दिग्दर्शिका म्हणून सुद्धा ती नावारूपास आली आहे. शिवाय रंगभूमीवर बऱ्याचदा आपल्या कार्याची झलक दाखवून सोडली आहे. तिला अभिनयासह गाणी आणि नृत्याची आवड आहे.
View this post on Instagram
मिर्झापूर वेबसीरिजच्या भरघोस यशानंतर ती ‘हाथी मेरे साथी’ या चित्रपटात दिसली होती. कल्कीच्या जागी श्रियाची वर्णी लागली आहे. या चित्रपटातून ती दाक्षिणात्य सिनेसृष्टीत पदार्पण करणार आहे. ज्यात ती एका पत्रकाराची भूमिका साकारणार आहे. तिच्यासोबत राणा दग्गुबत्ती, प्रभू सोलोमन, विष्णू विशाल आणि झोया हुसेन हे प्रमुख भूमिकेत दिसणार आहेत. या चित्रपटाचा ट्रेलर व्हर्चुअल पत्रकार परिषदेत लाँच केला होता. यात श्रियाची भूमिका विषेश लक्षणीय ठरणार आहे. त्यामुळे प्रेक्षकांच्या ती किती पसंतीस उतरतेय हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.
श्रियाचे मिर्झापुरमधील लूक आणि तिचे अभिनय हे विशेष गाजले. मिर्झापुरचा पहिला सिजन हा प्रेक्षकांना प्रचंड आवडला होता. श्रियाची भूमिका तर प्रेक्षकांच्या मनात घर करून राहिली होती. तिच्या या चित्रपटातील भूमिकेमुळे तिचे सर्वच स्तरावर कौतुक होत होते.
View this post on Instagram
अभिनयाचे बाळकडू आपल्या कुटुंबातूनच मिळालेल्या श्रियाने ‘तू तू मै मै’ या मालिकेत बिट्टीचे पात्र साकारले होते. तसेच सचिन पिळगावकर यांची निर्मिती असलेल्या ‘एकुलती एक’ या चित्रपटातून तिने मराठी सिनेसृष्टीत पदार्पण केले. या सिनेमातील श्रेयाच्या अभिनयाचे विशेष कौतुक झाले होते. तिने आपल्या करियरची सुरुवात ‘पेंटेड सिग्नल’ आणि ‘ड्रेसवाला’ शॉर्ट पॅन्ट च्या शॉर्टफिल्मच्या माध्यमातून केली. शाहरुख खानचा ‘फॅन’ या चित्रपटातून तिने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. अभिनव सिन्हा दिग्दर्शित ‘अभी तो पार्टी शुरू हुई है’ आणि गुरिंदर चड्डाचा ‘बिचम हाऊस’ मध्ये श्रिया पाहायला मिळणार आहे.
सर्वच क्षेत्रात सर्वगुणसंपन्न असणाऱ्या या अभिनेत्रीला झी युवा सन्मान या पुरस्कार सोहळ्यात ‘तेजस्वी चेहरा’ या पुरस्काराने गौरविण्यात आले होते.
दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सऍप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बोंबाबोंबचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-