Thursday, December 12, 2024
[aioseo_breadcrumbs]

‘आली रं पुण्याची मैना!’, श्रुती मराठेच्या वेड लावणाऱ्या अदांनी चाहतेही झाले हैराण

मराठी चित्रपटसृष्टीत असेही काही कलाकार आहेत, ज्यांनी मराठी व्यतिरिक्त इतर भाषिक चित्रपटांमध्ये काम काम करून आपले नाव कमावले आहे. यापैकीच एक प्रसिद्ध अभिनेत्री आहे श्रुती मराठे. तिने अभिनयासोबतच अदांनी देखील चाहत्यांना वेड लावले आहे. श्रुतीने मराठीच नव्हे, तर तमिळ, कन्नड आणि हिंदी चित्रपटात काम करून, प्रेक्षकांच्या मनात आपले अढळ स्थान निर्माण केले आहे.

श्रुती मराठे सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इंस्टाग्रामवर खूप सक्रिय असते. इथे तिला १२ लाखाहून अधिक युजर्स फॉलो करतात. अभिनेत्री नेहमी तिच्या वैयक्तिक आणि व्यावसायिक आयुष्याशी संबंधित फोटो आपल्या इंस्टाग्राम अकाऊंट शेअर करत असते, ज्याला तिच्या चाहत्यांकडून खूप पसंती मिळते. तिचे फोटो आणि व्हिडिओ नेहमीच इंटरनेटवर व्हायरल झालेले पाहायला मिळतात. आता श्रुतीने नुकताच शेअर केलेला व्हिडीओ चाहत्यांना वेड लावायला पुरेसा आहे.

या व्हिडिओमध्ये श्रुती ‘मला म्हणत्यात ओ म्हणत्यात पुण्याची मैना’ या प्रसिद्ध मराठी गाण्यावर आपल्या अदा दाखवताना दिसली आहे. तिच्या अदा पाहून जो तो तिचे कौतुक करत आहे. तिने लाल रंगाचा शॉर्ट प्रिंटेड फ्रॉक घातला आहे, ज्यात तिचे सौंदर्य कमालीचे दिसत आहे. या गाण्याचे बोल आहेत, ‘माझ्या गालावर पडते खळी हो खळी’. श्रुतीने याला अनुसरूनच कॅप्शन लिहिले आहे.

श्रुतीने कॅप्शनमध्ये लिहिलंय की, “पुण्याची मैना. माझ्या गालावर नाही पण, हनुवटीवर खळी पडते!” हा व्हिडिओ चाहत्यांमध्ये खूप पसंत केला जात आहे. बघता बघताच व्हिडिओवर तब्बल ७६ हजाराहून अधिक लाईक्स आले आहेत. सोबतच चाहते कमेंट करून त्यांचे प्रेम व्यक्त करत आहेत. याच लूकमधील तिचे काही फोटोही समोर आले आहेत, ज्यांना नेहमीप्रमाणे चाहत्यांचे प्रेम मिळत आहे.

श्रुतीच्या कारकिर्दीबद्दल बोलायचे झाले, तर २००८ मध्ये तिने ‘सनई चौघडे’ या मराठी चित्रपटाद्वारे आपल्या अभिनय कारकीर्दीची सुरूवात केली होती. २००९ मध्ये श्रुतीने ‘इंदिरा विजहा’ या चित्रपटातून तमिळ चित्रपटसृष्टीत पदार्पण केले. या चित्रपटात सुपरस्टार नासिरसुद्धा दिसला होता. विशेष म्हणजे, हा चित्रपट अक्षय कुमार, करीना कपूर आणि प्रियंका चोप्रा यांच्या ‘ऐतराज’ या बॉलिवूड चित्रपटाच्या कहाणीवर आधारित होता.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हे देखील वाचा