Thursday, December 12, 2024
[aioseo_breadcrumbs]

श्रुती मराठेच्या नजरेने केला चाहत्यांच्या हृदयावर वार; तिच्या ‘हॉट ऍंड ग्लॅमरस’ फोटोला नेटकऱ्यांची पसंती

मराठी चित्रपटसृष्टीतली प्रसिद्ध अभिनेत्री श्रुती मराठे या दिवसांत तिच्या पोस्ट्समुळे खूप चर्चेत असते. एका पेक्षा एक फोटो शेअर करून, ती चाहत्यांना वेड लावण्यात कोणतीही कसर बाकी सोडत नाहीये. ती नेहमी सोशल मीडियावर सक्रिय राहून, तिचे वेगवेगळे फोटोशूट या ठिकाणी शेअर करताना दिसते. तिचा दिलखेचक अंदाज नेहमीच प्रेक्षकांच्या पसंतीस उतरतो. आता पुन्हा श्रुतीच्या फोटोने चाहत्यांवर जादू केली आहे.

श्रुती मराठेने नेहमीप्रमाणेच तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर हे फोटो शेअर केले आहेत. यात तिच्या अदा पाहून, कोणीही सहज तिच्या प्रेमात पडेल, असे म्हणणे चुकीचे ठरणार नाही. तुम्ही पाहू शकता की, यात श्रुतीने अबोली रंगाचा टॉप घातला आहे. परफेक्ट असा मेकअप करून, सोबतच हलके कर्ल करून तिने मेसी बन बांधला आहे. एकंदरित असा ग्लॅमरस लूक करून, श्रुती फोटोसाठी पोझ देत आहे. यात अभिनेत्री अतिशय सुंदर दिसत आहे.

श्रुती मराठेने हा फोटो शेअर करत लिहिले आहे की, “साधेपणा आणि अपूर्णतेमध्ये खरी सुंदरता असते.” हा फोटो सोशल मीडियावरील तिच्या चाहत्यांमध्ये मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. तिचा हा अंदाज चाहत्यांना चांगलाच आवडल्याचे दिसून येत आहे. फोटो शेअर करता क्षणीच यावर लाईक्स आणि कमेंट्सचा पाऊस पडायला सुरुवात झाली. चाहते कंमेट करून तिच्या सुंदरतेचं कौतुक करत आहेत. काही कलाकारांनी देखील यावर कमेंट केली आहे. (shruti marathe shared her bold and glamorous photo on social media)

श्रुती अशा कलाकारांपैकी एक आहे, ज्यांनी मराठी व्यतिरिक्त इतर भाषिक चित्रपटांमध्ये काम काम करून आपले नाव कमावले आहे. श्रुतीने मराठीसोबत तमिळ, कन्नड आणि हिंदी चित्रपटात काम करून, प्रेक्षकांच्या मनात आपले अढळ स्थान निर्माण केले आहे. आपल्या अभिनयासोबतच, ती सोशल मीडिया पोस्टनेही प्रेक्षकांना प्रभावित करते. दरदिवशी तिचे फोटो मोठ्या प्रमाणात इंटरनेटवर व्हायरल होत असतात.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-शिल्पाने पती राज कुंद्राबाबत केला मोठा खुलासा; ‘सुपर डान्सर ४’ च्या मंचावर सर्वांसमोर म्हणाली…

-दुःखद : शेखर सुमन यांच्या आईचे निधन; सोशल मीडियावर भावनिक पोस्ट शेअर करत दिली माहिती

-आर्थिक अडचणींमुळे करावी लागली चोरी; ‘क्राइम पेट्रोल’, ‘सावधान इंडिया’ फेम ‘या’ दोन अभिनेत्रींना ठोकण्यात आल्या बेड्या

हे देखील वाचा