मराठी चित्रपटसृष्टीतली प्रसिद्ध अभिनेत्री श्रुती मराठे या दिवसांत तिच्या पोस्ट्समुळे खूप चर्चेत असते. एकापेक्षा एक फोटो शेअर करून, ती चाहत्यांना वेड लावण्यात कोणतीही कसर बाकी सोडत नाहीये. ती नेहमी सोशल मीडियावर सक्रिय राहून, तिचे वेगवेगळे फोटोशूट या ठिकाणी शेअर करताना दिसते. तिचा दिलखेचक अंदाज नेहमीच प्रेक्षकांच्या पसंतीस उतरतो. आता पुन्हा श्रुतीच्या फोटोने चाहत्यांवर जादू केली आहे.
श्रुती मराठेने नेहमीप्रमाणेच तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर हे फोटो शेअर केले आहेत. यात तिच्या अदा आणि लुक्स पाहून कोणीही सहज तिच्या प्रेमात पडेल, असे म्हणणे चुकीचे ठरणार नाही. तुम्ही पाहू शकता की, यात श्रुतीने काळ्या रंगाचे आऊटफिट परिधान केले आहे. परफेक्ट असा मेकअप करून, सोबतच हेअर कर्ल करून ती फोटोसाठी पोझ देत आहे. यात अभिनेत्री अतिशय सुंदर दिसत आहे.
श्रुती मराठेने हे फोटो शेअर करत लिहिले आहे की, “ज्ञानी मुलीला तिच्या मर्यादा माहित असतात, मात्र हुशार मुलीला माहित असते की तिला मर्यादाच नाहीत!” हा फोटो सोशल मीडियावरील तिच्या चाहत्यांमध्ये मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. तिचा हा अंदाज चाहत्यांना चांगलाच आवडल्याचे दिसून येत आहे. फोटो शेअर करता क्षणीच यावर लाईक्स आणि कमेंट्सचा पाऊस पडायला सुरुवात झाली. चाहते कंमेट करून तिच्या सुंदरतेचं कौतुक करत आहेत. तर अभिनेता प्रसाद ओकने देखील यावर कमेंट करून तिचे कौतुक केले आहे.
श्रुतीने केवळ मराठीच नव्हे तर इतर अनेक भाषांमध्ये काम केले आहे. तिने मराठीसोबत तमिळ, कन्नड आणि हिंदी चित्रपटात काम करून, प्रेक्षकांच्या मनात आपले अढळ स्थान निर्माण केले आहे. आपल्या अभिनयासोबतच, ती सोशल मीडिया पोस्टनेही प्रेक्षकांना प्रभावित करते. दरदिवशी तिचे फोटो मोठ्या प्रमाणात इंटरनेटवर व्हायरल होत असतात.
दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…
हेही नक्की वाचा-