बॉलिवूड आणि टेलिव्हिजनवरील लोकप्रिय अभिनेत्री श्वेता तिवारीची मुलगी पलक तिवारी ही चित्रपटसृष्टीत लवकरच पदार्पण करणार आहे. ती ‘रोजी द : सॅफरॉन चॅप्टर’ या चित्रपटात मुख्य भूमिका साकारून चित्रपटसृष्टीत प्रवेश करणार आहे. ती सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. तिचे इंस्टाग्रामवरील फोटो पाहून समजते की, ती खूपच फॅशनेबल आहे. ती खूपच स्टायलिश आणि ग्लॅमरस आहे. सोशल मीडियावर तिच्या चाहत्यांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहेत. (Shweta Tiwari’s daughter palak tiwari glamorous photo viral on social media)
पलक तिवारीने नुकतेच एक फोटोशूट केले आहे. जो व्हिडिओ तिने इंस्टाग्राम अकाऊंटवरून शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये ती खूपच सुंदर दिसत आहे. तिच्या चाहत्यांना हा व्हिडिओ खूप आवडला आहे. तिने या फोटोमध्ये काळ्या रंगाचा ड्रेस परिधान केला आहे. या ड्रेसमध्ये ती खूपच आकर्षक दिसत आहे. चाहते तिच्या या व्हिडिओवर जोरदार लाईक्स आणि कमेंट करत आहेत.
पलक तिवारीच्या आगामी चित्रपटाचे प्रोडक्शन विवेक ओबेरॉयच्या ओबेरॉय मेगा एंटरटेनमेंट, मंदिरा एंटरटेनमेंट आणि प्रेरणा वी अरोरा हे मिळून करत आहेत. विवेक ओबेरॉयने याचे पोस्टर शेअर करून ट्विट केले आहे की, “गोष्टी नेहमी #rosie प्रमाणे नसतात, जशा त्या दिसतात त्यामुळे मागे वळून पाहू नका. मी कास्टमध्ये सामील आहे याचा मला खूप आनंद आहे. रोजी ‘द : सॅफरॉन चॅप्टर’ चा फर्स्ट लूक शेअर करत आहे. आशा करतो की, तुम्हाला तो नक्की आवडेल.” शेवटी त्याने फोल्डिंग हॅण्ड आणि स्माइलिंग फेसची ईमोजी पोस्ट केली होती. तसेच या चित्रपटाचे दिग्दर्शन विशाल रंजन मिश्रा करत आहे.
दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…
हेही नक्की वाचा-
-पवनदीप राजनच्या आवाजाचे केले करिश्मा कपूरने कौतुक; परफॉर्मन्सच्या मध्येच पोहोचली स्टेजवर