Saturday, July 6, 2024

सिद्धांत कपूरच्या अटकेनंतर पार्टीचा व्हिडिओ व्हायरल, मित्रांसोबत एन्जॉय करताना दिसला शक्ती कपूरचा मुलगा!

चित्रपट अभिनेता शक्ती कपूरचा (Shakti Kapoor) मुलगा अभिनेता सिद्धांत कपूर (Siddhant Kapoor) याला बेंगळुरू पोलिसांनी अटक केली आहे. बेंगळुरूमधील एका हॉटेलमधून रविवारी (१२ जून) रात्री रेव्ह पार्टीदरम्यान अंमली पदार्थ घेतल्याप्रकरणी सिद्धांतला अटक करण्यात आली आहे. सिद्धांतची वैद्यकीय चाचणी करण्यात आली असून, त्याचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. दरम्यान, सिद्धांतचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे, ज्यामध्ये तो एका पार्टीत एन्जॉय करताना दिसत आहे. हा व्हिडिओ त्याच रेव्ह पार्टीचा असल्याचे बोलले जात आहे, जिथे पोलिसांनी छापा टाकून सिद्धांतला अटक केली होती. मात्र, हा व्हिडिओ त्याच पार्टीचा असल्याचा दावा आम्ही करत नाही. 

व्हिडिओमध्ये सर्वत्र लाल रंगाची लाइटिंग दिसत आहे, जी सहसा कोणत्याही डिस्को किंवा पार्टीमध्ये असते. व्हिडिओमध्ये दिसत आहे की, या पार्टीत सिद्धांत डीजे बनून गाणी वाजवत आहे आणि सर्वांना आपल्या तालावर नाचावत आहे. सिद्धांत गाणे वाजवताना स्वतःही खूप एन्जॉय करताना दिसत आहे. (siddhanth kapoor rave party video viral)

या व्हिडिओशिवाय, पार्टीचा आणखी एक व्हिडिओ व्हायरल होत आहे, ज्यामध्ये काही पोलिस तेथे उपस्थित असलेल्या लोकांना प्रश्न विचारताना दिसत आहेत. ज्या पार्टीमध्ये सिद्धांतही उपस्थित होता. हा व्हिडीओ त्याच पार्टीचा असल्याचेही बोलले जात आहे. मात्र आम्ही याची पुष्टी करत नाही.

बेंगळुरू पोलिसांनी रविवारी रात्री एका पंचतारांकित हॉटेलवर छापा टाकला होता. जिथे हाय प्रोफाईल अंमली पदार्थांची पार्टी होत होती. या पार्टीत ३५ जणांच्या रक्ताचे नमुने घेण्यात आले, ज्यापैकी ६ जणांची चाचणी पॉझिटिव्ह आली. त्या सहा जणांमध्ये सिद्धांतही सामील होता. डीएसपी डॉ भीमाशंकर एस गुलेद यांनी सांगितले की, सिद्धांत कपूरची टेस्ट पॉझिटिव्ह आली आहे.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

हेही वाचा

हे देखील वाचा