अरं हलद लागली…! सिद्धार्थ-मितालीची लगीनघाई, हळदीचे फोटो आले समोर; पाहा झक्कास फोटो

अरं हलद लागली...! सिद्धार्थ-मितालीची लगीनघाई, हळदीचे फोटो आले समोर; पाहा झक्कास फोटो


मराठी चित्रपटसृष्टीतील सर्वात गोड जोडी सिद्धार्थ चांदेकर आणि मिताली मयेकर लवकरच विवाहबद्ध होत आहेत. सध्या दोघांच्याही घरी लग्नाच्या आधीचे सर्व विधी सुरु आहेत. त्याचे फोटो सिद्धार्थ आणि मितालीने सोशल मीडियावर पोस्ट देखील करत आहेत.

या दोघांचाही हळदीचा समारंभ झाला आहे. सिद्धार्थने हळदीचे फोटो सोशल मीडिया अकाउंटवर शेअर केले आहेत. तर ‘अरं हलद लागली. 💛’, ‘ Cant think of a better view.💛’असे कॅप्शन देत रोमँटिक फोटो शेअर केले आहेत.

मिताली आणि सिद्धार्थ यांना हळद लागली आहे. त्यांच्या हळदीच्या सोहळ्याचे फोटोज सध्या सोशल मीडियात वायरल झाले आहेत. हळदी सोबतच त्यांचा संगीत समारोह देखील पार पडला आहे. यामध्ये मित्र मंडळी आणि नातेवाईकांसोबत सिद्धार्थ चांदेकर आणि मिताली मयेकर दोघेही मराठीतील ब्लॉकबस्टर गाण्यांवर थिरकताना दिसले आहेत.

‘We have entered the घोडा मैदान now.♥️’असं मजेदार कॅप्शन देत मितालीनं काही फोटो शेअर केले आहे. या फोटोमध्ये दोघंही प्रचंड खूश दिसत आहेत.

गेली अनेक वर्ष सिद्धार्थ आणि मिताली एकमेकांना डेट करत आहे. त्यामुळे या दोघांच्या जोडीचे अनेक चाहते आहेत. सिद्धार्थ आणि मिताच्या मित्रपरिवाराकडून आणि चाहत्यांकडून #tinypanda हा हॅशटॅग व्हायरल करण्यात येतोय. कारण सिद्धार्थ मितालीला प्रेमाने tiny म्हणतो तर मिताली सिद्धार्थला panda म्हणते.


Leave A Reply

Your email address will not be published.