मराठी चित्रपट सृष्टीतील ‘चॉकलेट बॉय’ म्हणजे अभिनेता सिद्धार्थ चांदेकर. सिद्धार्थ हा सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात सक्रिय असतो. त्याच्या अभिनयाने आणि लूकने तो सर्वांनाच त्याच्याकडे आकर्षित करत असतो. त्याचे वैयक्तिक आयुष्य असो, नाहीतर त्याचे व्यावसायिक आयुष्य असो तो नेहमीच त्याच्या चाहत्यांना सोशल मीडिया मार्फत माहिती देत असतो. त्याचे फोटो देखील वेगाने सर्वत्र व्हायरल होत असतात. असाच एक त्याचा फोटो सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ घालताना दिसत आहे.
सिद्धार्थ चांदेकरने त्याच्या अधिकृत फेसबुक पेजवरून त्याचा एक थ्रोबॅक फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये त्याने लाल रंगाचा चेक्सचा शर्ट घातला आहे. तो एका पुलावर उभा राहून बाहेर पाहताना दिसत आहे. त्याचा हा फोटो तर त्याच्या सगळ्या चाहत्यांना आवडलाच आहे.
यासोबतच त्याने फोटोला दिलेले कॅप्शन सर्वांचे लक्ष वेधत आहे. हा फोटो शेअर करून सिद्धार्थने “शाळेच्या खिडकीतून रस्त्यावरची मारामारी बघताना,” कॅप्शन दिले आहे. त्याचे हे कॅप्शन त्याच्या चाहत्यांना खूपच आवडले आणि पटले देखील आहे. सगळे त्याच्या या फोटोवर सातत्याने कमेंट करताना दिसत आहेत. सिद्धार्थचा हा फोटो तेव्हाचा आहे जेव्हा तो लंडनमध्ये गेला होता. या फोटोवर चाहते भरभरून प्रतिक्रिया येताना दिसत आहेत.
https://www.facebook.com/100044272364327/posts/342577907227952/?substory_index=0
सिद्धार्थ चांदेकरच्या कामाबद्दल बोलायचे झाल्यास, त्याने 2010 साली अवधूत गुप्तेच्या ‘झेंडा’ या चित्रपटातून मराठी चित्रपटसृष्टीमध्ये प्रवेश केला. त्यांनतर त्याने ‘क्लासमेट’, ‘वजनदार’, ‘झिम्मा’, ‘बस स्टॉप’, ‘सिटी ऑफ ड्रिम’, ‘रणांगण’, ‘हिरकणी’ या सारख्या चित्रपटात काम करून त्याच्या अभिनयाची छाप प्रेक्षकांवर पडली आहे. तो सध्या स्टार प्रवाहवरील ‘सांग तू आहेस ना’मालिकेत काम करत आहे.
सिद्धार्थच्या वैयक्तिक आयुष्याबाबत बोलायचे झाल्यास, त्याने या वर्षाच्या सुरुवातीला त्याची गर्लफ्रेंड मिताली मयेकर हिच्यासोबत विवाह केला आहे. मिताली देखील मराठी चित्रपटसृष्टीतील एक अभिनेत्री आहे. जवळपास चार वर्षांच्या रिलेशननंतर ते विवाह बंधनात अडकले आहेत.
दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…
हेही नक्की वाचा-
-परिणीती चोप्राचा समुद्र किनाऱ्यावरील ग्लॅमरस फोटो व्हायरल, बहीण प्रियांका चोप्राचा असा झाला जळफळाट
-आहा कडकच ना! ‘लुट गए’ गाण्यावर पोरीचा जबरदस्त डान्स, मिळाले १ कोटीपेक्षाही अधिक व्ह्यूज