‘…लोळणार म्हणजे लोळणारच!’ विखुरलेले केस अन् अर्धे झाकलेले डोळे, सिद्धार्थ चांदेकरने शेअर केला फोटो


सुट्टीचा दिवस म्हटलं की, सर्वजण सकाळी उशिरापर्यंत झोप घेतात. ते म्हणतात ना ‘जब जागो तब सवेरा’ असाच काहीसा प्रकार हा सुट्टीच्या दिवशी पाहायला मिळतो. कलाकारही याला अपवाद नाहीत. सर्व सामान्यांप्रमाणे कलाकार मंडळी देखील सुट्टीच्या दिवशी निवांत झोप घेतात. याचे उदाहरण म्हणजे अभिनेता सिद्धार्थ चांदेकर होय.

सिद्धार्थने त्याच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून एक फोटो शेअर केला आहे. यात तो नुकताच झोपेतून उठलेला दिसत आहे. विखुरलेले केस आणि अर्धे झाकलेले डोळे अशा अवतारातील हा फोटो चाहत्यांकडूनही चांगलाच पसंत केला जात आहे. विशेष म्हणजे, फोटो शेअर करत सिद्धार्थ म्हणतोय की, सुट्टीच्या कितीही वाजता उठलं तरी ती पहाटच असते. (siddharth chandekar shared post after waking up late)

हा फोटो शेअर करत सिद्धार्थने कॅप्शनमध्ये लिहिलंय की, “सुट्टीच्या दिवशी ११ वाजता पण पहाट असते. लोळणार म्हणजे लोळणार.” हा फोटो आणि याखालचे कॅप्शन नेटकरी त्यांच्या आयुष्याशी जोडून पाहत आहेत. तो म्हणतोय ते अगदी खरं आहे, असं नेटकरी त्याला कमेंट्सच्या माध्यमातून सांगत आहेत. शिवाय काही नेटकरी गंमतीमध्ये त्याला आळशीही म्हणत आहेत.

सिद्धार्थने २००७ साली ‘हमने जीना सीख लिया’ या हिंदी चित्रपटाद्वारे अभिनय क्षेत्रात पदार्पण केलं होतं. तर वयाच्या १९व्या वर्षी त्याने अवधुत गुप्तेच्या ‘झेंडा’ या चित्रपटाद्वारे मराठी सिनेसृष्टीत पदार्पण केलं होतं. त्याला ‘क्लासमेट’ चित्रपटातील त्याच्या अभिनयासाठी ओळखले जाते. याशिवाय त्याने अनेक चित्रपट आणि मालिकांमध्ये काम करून, प्रेक्षकांची मने जिंकली आहेत.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-टायगर श्रॉफची बहीण कृष्णाने सांगितला तिचा फिटनेस मंत्र; म्हणाली, ‘सातत्य हीच तुमच्या यशाची…’

-वाढदिवशी मिळालेल्या शुभेच्छांसाठी कॅटरिनाने फोटो शेअर करत मानले सर्वांचे आभार; म्हणाली, ‘तुम्ही दिलेल्या प्रेमाबद्दल…’

-केवळ ५०० रुपये घेऊन मुंबई आलेल्या रवी किशनचे आज आहे १२ बेडरूमचे मोठे घर; बराच संघर्षमय होता त्याचा सिनेप्रवास


Leave A Reply

Your email address will not be published.