Saturday, June 29, 2024

अभिनेता सिद्धार्थ चांदेकरने २०२१ वर्षात त्याला मिळालेल्या यशासाठी मानले प्रेक्षकांचे आभार, म्हणाला…

आपण सर्व आता २०२१ वर्षाच्या शेवटाकडे आलो आहोत. २०२१ वर्षाला निरोप देत आपण २०२२ वर्षात प्रवेश करणार आहोत. २०२१ हे वर्ष आपल्या सर्वांसाठीच मिक्स भावनांचे होते. २०२१ वर्षातील पहिले सहा महिने कोरोना आणि लॉकडाऊनमध्ये गेल्यानंतर उत्तरार्ध मात्र सर्वांसाठीच मोकळा श्वास घेणारा होता. २०२१ वर्षातील शेवटचे ३/४ महिने चित्रपटसृष्टीसाठी सोबतच प्रेक्षकांसाठी देखील खूपच चांगले आणि अविस्मरणीय गेले. २०२१ वर्ष संपवण्याच्या उंबरठयावर आपण असताना अनेक कलाकार सोशल मीडियावर त्यांचे २०२१ वर्षाबद्दलचे अनुभव आणि २०२२ कडून काय अपेक्षा आहेत हे लिहीत शेअर करत आहेत. मराठी इंडस्ट्रीमधील हँडसम आणि चार्मिंग अभिनेता अशी ओळख असलेल्या सिद्धार्थ चांदेकरने देखील त्याच्या इंस्टाग्रामवर एक पोस्ट शेअर करत यावर्षी त्याला मिलेल्या यशाबद्दल सर्वांचे आभार मानले आहे.

सिद्धार्थ चांदेकरसाठी २०२१ हे वर्ष चांगले गेले. यावर्षी त्याने मनोरंजनाच्या सर्वच माध्यमांमध्ये काम केले आहे. त्याला या सर्वच मध्यमनमध्ये प्रेक्षकांनी भरभरून प्रेम दिले. याबद्दल त्याने सोसहल मीडियावर एक पोस्ट लिहिले म्हटले आहे, “हे अख्खं वर्ष माझ्यासाठी वेगवेगळ्या विषयांचं आणि वेगवेगळ्या माध्यमांचं गेलं. मी ह्या सगळ्या माध्यमांमधून तुमचं मनोरंजन करू शकलो ह्याचा मला प्रचंड आनंद आहे. सिनेमा असो किंवा सीरिअल, वेब सिरीज असो किंवा रियालिटी शो तुम्ही मला सगळीकडेच भरभरून प्रेम दिलंत. ह्यावर्षी प्रमाणेच पुढच्याही वर्षी काहीतरी नवीन आणि काहीतरी वेगळं घेऊन येण्याचा प्रयत्न करेन. तुमचे आशीर्वाद आणि प्रेम असंच राहूदे. धन्यवाद, आणि नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा.”

यावर्षी सिद्धार्थने ‘अधांतरी’ नावाची सिरीज केली, ‘सांग तू आहेस का?’ ही मालिका केली, ‘मी होणार सुपरस्टार छोटे उस्ताद’ नावाच्या शोचे सूत्रसंचालन केले. याशिवाय त्याचे सिनेमे देखील आले. त्याचा नुकताच ‘झिम्मा’ नावाचा सिनेमा प्रदर्शित झाला, ज्याला प्रेक्षकांनी अमाप प्रतिसाद दिला. त्यामुळे सिद्धार्थला तर २०२१ हे वर्ष खूपच चांगले आणि यशस्वी गेले. यासोबतच त्याच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल सांगायचे झाल्यास त्याने २०२१ वर्षाच्या सुरुवातीला लगीनगाठ देखील बांधली. अभिनेत्री मिताली मयेकरसोबत त्याने लग्न केले.

हेही वाचा :

हे देखील वाचा