Tuesday, July 9, 2024

मराठमोळ्या रांगड्या सिद्धूचा स्टायलिश अंदाज, फॅन्सकडून येत आहेत भन्नाट कमेंट्स

मराठी चित्रपटसृष्टीत एक असा अभिनेता आहे, ज्याला आज कोणत्याही परिचयाची गरज नाही. लहानांपासून ते वृद्धांपर्यंत सर्वजण त्याला ओळखतात. तो अभिनेता इतर कुणी नसून आपल्या सर्वांचा लाडका ‘सिद्धू’ अर्थात सिद्धार्थ जाधव होय. सिद्धार्थने आपल्या अभिनयाच्या जादूने चाहत्यांच्या मनात मानाचे स्थान निर्माण केले आहे. आपल्या विनोदाने तर त्याने प्रेक्षकांना पोट धरून हसायला भाग पाडले आहे. अभिनयाने चित्रपटसृष्टी गाजवणारा सिद्धू सोशल मीडियावरही चांगलाच सक्रिय असतो. तो नेहमीच आपल्या आयुष्यातील प्रत्येक गोष्ट शेअर करत असतो. अशातच त्याने सोशल मीडियावर त्याचे काही फोटो शेअर केले आहेत.

सिद्धार्थने अधिकृत इंस्टाग्राम अकाउंटवरून त्याचे काही स्टायलिश फोटो शेअर केले आहेत. या फोटोमध्ये आपण पाहू शकतो की, त्याने काळ्या रंगाचा सूट घातला आहे. या ड्रेसवर आपण पाहू शकतो की, काळ्या आणि पांढऱ्या रेषा असलेले पॅचेस आहेत. तसेच एका बाजूला नॉड बांधलेली आहे. तसेच त्याने पायात देखील काळ्या आणि पांढऱ्या रंगाचे शूज घातले आहे. त्याने डोळ्यांवर चष्मा लावला आहे. (Siddharth Jadhav share her stylish look on Instagram)

त्याच्या या लूकमध्ये तो खूपच डॅशिंग आणि स्टायलिश दिसत आहे. हे फोटो शेअर करून त्याने ‘आपला सिद्धू’ असे कॅप्शन दिले आहे. मराठमोळ्या रांगड्या सिद्धूचा हा स्टायलिश अंदाज त्याच्या चाहत्यांना खूप आवडला आहे. अनेकजण या फोटोवर त्यांच्या प्रतिक्रिया देत आहेत. त्याच्या एका चाहत्याने कमेंट केली आहे की, “सिद्धू भाऊ कडक.” तसेच आणखी एका चाहत्याने “सिद्धू डॉन,”अशी कमेंट केली आहे. त्याचा हा लूक सध्या सोशल मीडियावर चांगलाच चर्चेत आहे.

सिद्धार्थने ‘यांचा काही नेम नाही’, ‘बकुळा नामदेव घोटाळे’, ‘जबरदस्त’, ‘साडे माडे तीन’, ‘दे धक्का’, ‘गलगले निघाले’, ‘बाप रे बाप डोक्याला ताप’, ‘शिक्षणाच्या आयचा घो’, ‘मी शिवाजीराजे भोसले बोलतोय’, ‘हुप्पा हुय्या’, ‘क्षणभर विश्रांती’, ‘इरादा पक्का’, ‘टारगेट’, ‘फक्त लढ म्हणा’, ‘कुटुंब’, ‘खो-खो’, ‘ढोलकी’, ‘माऊली’, ‘धुरळा’ यांसारख्या अनेक चित्रपटात काम केले आहे. यासोबतच त्याने ‘राधे’, ‘सिंबा’, ‘पावडर’, ‘गोलमाल रिटर्न्स’, ‘आउटसोर्स’ या हिंदी चित्रपटात काम केले आहे.

हे देखील वाचा