मागील अनेक दिवसांपासून अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रा आणि अभिनेत्री कियारा अडवाणी यांच्या लग्नाच्या चर्चा होत्या. अखेर या दोघांनी ७ फेब्रुवारी रोजी लग्न केले. त्यांचे लग्न अतिशय गुप्त पद्धतीने मीडियापासून लांब आणि मोजक्या लोकांच्या उपस्थितीत झाले. त्यांचे फॅन्स त्यांच्या लग्नाच्या फोटोंची आतुरतेने वाट बघत होते. मग लग्नाच्या दिवशी संध्याकाळी कियारा आणि सिद्धार्थ यांनी त्यांच्या सोशल मीडिया अकाऊंटवरून त्यांच्या लग्नाचे फोटो पोस्ट केले. हे फोटो काही क्षणात व्हायरल झाले आणि ट्रेंड झाले.
त्यांच्या लग्नाचे फोटो समोर आल्यानंतर चर्चा रंगली ती त्यांच्या लूकची. त्याच्या आयुष्यातील अतिशय खास दिवशी दोघेही कमालीचे स्टनिंग दिसत होते. त्याचे कपडे, मेकअप, दागिने सर्वच गोष्टी एकदम परफेक्ट होत्या. कियाराचा लेहेंगा आणि त्यावरचे तिचे दागिने तर अतिशय सुंदर होते. कियारा आणि सिद्धार्थ यांनी त्यांच्या लग्नाचा ड्रेस प्रसिद्ध फॅशन डिझायनर असलेल्या मनीष मल्होत्राकडून डिझाइन करून घेतला होता. खुद्द मनीषने त्याच्या सोशल मीडिया अकाऊंटवरून सिद्धार्थ आणि कियारा यांच्या ड्रेसबद्दल माहिती दिली.
The alluring #ManishMalhotraBride @advani_kiara & the imperial #ManishMalhotraGroom @SidMalhotra in our custom @ManishMalhotra ensembles. #KiaraAdvani adorns #ManishMalhotraBespokeDiamondJewellery and #SidharthMalhotra adorns Manish Malhotra Polki Jewellery by Raniwala 1881 pic.twitter.com/nS4UwVeJMI
— ManishMalhotraWorld (@MMalhotraworld) February 7, 2023
मनीष मल्होत्राने सिद्धार्थ आणि कियाराचा लग्नातील फोटो पोस्ट करत लिहिले, “कियाराच्या ड्रेसवर रोमन वास्तुकलेतील डिझाइन केली आहे. कारण त्या दोघांनाही ती जागा फार आवडते. यासोबतच कियाराच्या लेहेंग्यावर सिरोस्की क्रिस्टलचे खूपच फाइन हॅन्डवर्क केले गेले आहे. यासोबतच तिने या लेहेंग्यावर मनीषने डिझाइन केलेले दागिने घातले होते. यात जाम्बियन एमराल्ड सोबत हॅन्ड कट असलेले डायमंड लावण्यात आले आहेत. तर तिची बिंदी पूर्ण डायमंडची आहे.”
दुसरीकडे त्याने सिद्धार्थच्या लुकबद्दल सांगितले की, “सिद्धार्थने गोल्डन रंगाची शेरवानी घातली असून, त्यावर आयव्हरी रंगाचे काम आणि गोल्डन जरदोजी वर्क केले आहे. हा ड्रेस पूर्णपणे हाताने तयार केला असून, यावर सिद्धार्थने पोलकी ज्वेलरी सेट घातला होता. यामुळे त्याचा लूक एकदम रॉयल दिसत होता.”
सर्वच कपल प्रमाणे सिद्धार्थ आणि कियारा देखील त्यांच्या लग्नाच्या ड्रेसमध्ये एकदम युनिक आणि सुंदर दिसत होते. त्यांच्या लग्नाच्या फोटोनंतर तर त्यांच्या लुकचीच सर्वात जास्त चर्चा होताना दिसत आहे.
दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सऍप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बोंबाबोंबचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
नाना पाटेकर यांनी आतंकवाद्यची भूमिका आहे म्हणून बॉडी ऑफ लाइज हॉलीवूडपटाला दिला होता झटक्यात नकार
बिग बींना बेल बाॅटम घालने पडले महागात, एक उंदीर त्यांच्या पॅटंमध्ये घुसला अन्…