बॉलिवूडमध्ये कलाकार तर कलाकार इतर निर्माते आणि दिग्दर्शक देखील खूप प्रसिद्ध आहे. कलाकार पडद्यावर दिसत असल्याने त्यांचे चेहरे आणि नावे मोठ्या प्रमाणात गाजतात. मात्र कॅमेऱ्यामागे असणारे अनेक चेहरे हे अतिशय प्रसिद्ध आणि प्रतिभावान असतात. चित्रपट तयार होताना सर्वात महत्वाची व्यक्ती म्हणजे निर्माता. निर्माता नसेल तर सिनेमा तयार होऊच शकत नाही. इंडस्ट्रीमध्ये अनेक मोठे आणि यशस्वी निर्माते आहेत, त्यांच्यापैकीच एक म्हणजे सिद्धार्थ रॉय कपूर. सिनेसृष्टीतील सर्वात मोठा आणि यशस्वी दिग्दर्शक म्हणून त्याच्याकडे पाहिले जाते. सिद्धार्थची दुसरी ओळख म्हणजे तो अभिनेत्री विद्या बालनचा पती देखील आहे. २ ऑगस्टला सिद्धार्थ त्याचा वाढदिवस साजरा करतो. यानिमित्ताने जाणून घेऊया या दोघांच्या प्रेमकहाणीबद्दल.
‘पीहू’, ‘दंगल’, ‘सत्याग्रह’, ‘चेन्नई एक्सप्रेस’, ‘हीरोइन’, ‘बर्फी’, ‘नो वन किल्ड जेसिका’, ‘पान सिंग तोमर’ आदी अनेक हिट सिनेमांची निर्मिती करणाऱ्या सिद्धार्थचा जन्म २ ऑगस्ट १९७४ ला झाला. सिद्धार्थ ‘रॉय कपूर फिल्म्स’चा मालक आहे. त्याची आई सलोमी रॉय या माजी मिस इंडिया होत्या. शिवाय त्या उत्तम डान्सर आणि कोरिओग्राफरही होत्या. सिद्धार्थला आदित्य रॉय कपूर आणि कुणाल रॉय कपूर हे दोन भाऊ असून, दोघेही अभिनय क्षेत्रात आहेत. सिद्धार्थचे दोन लग्न झाले असून, त्याने विद्यासोबत तिसरे लग्न केले आहे. सिद्धार्थने पहिले लग्न त्याची बालमैत्रिण असलेल्या आरती बजाजसोबत केले होते. मात्र हे लग्न जास्त काळ टिकू शकले नाही. त्यानंतर त्याने दुसरे लग्न टीव्ही प्रोड्यूसर असणाऱ्या कवितासोबत केले. पण, हेही लग्न यशस्वी झाले नाही. त्यानंतर सिद्धार्थने विद्या बालनसोबत तिसरे लग्न केले. (vidya balan and siddharth love story)
सिद्धार्थ आणि विद्याची भेट फिल्मफेयर पुरस्करांच्या वेळी बॅकस्टेजला झाली. त्या काळात सिद्धार्थ त्याच्या दोन्ही घटस्फोटांमुळे खूपच दुःखात होता. या दोघांच्या पहिल्या भेटीदरम्यान त्यांनी केवळ एकमेकांना हाय केले. पुढे विद्या आणि सिद्धार्थ दोघेही त्यांच्या कामात व्यस्त झाले. मात्र तरीही त्यांना एकमेकांबद्दल काहीतरी वेगळे जाणवत होते. पुढे या दोघांना पुन्हा भेटता आले, ते करण जोहरमुळे. करण दोघांचाही कॉमन मित्र होता. यामुळे करण या दोघांना खूपच चांगले ओळखत होता. त्याला या दोघांच्या मनात काय चालू आहे, याची कुणकुण लागली होती. करणनेच या दोघांची पहिली डेट फिक्स केली होती. पहिल्याच भेटीत हे दोघे खूप चांगले मित्र झाले. त्यानंतर यांची प्रेम कहाणी सुरु झाली. या दोघांनी त्यांचे रिलेशन अनेक दिवसांपर्यंत सर्वांपासून लपवून ठेवले होते. मात्र या दोघांबद्दल मीडिया आणि इंडस्ट्रीमध्ये बातम्या पसरल्या होत्या.
या दोघांना अनेक लोकांनी अनेक ठिकाणी पाहिले. जेव्हा खूपच बातम्या यायला लागल्या, तेव्हा मे २०१२ मध्ये विद्याने ती सिद्धार्थाला डेट करत असल्याचे कबुल केले. यानंतर काही महिन्यांनी डिसेंबर २०१२ सिद्धार्थ आणि विद्याने लग्न केले. त्यांच्या लग्नाला आठ वर्ष पूर्ण झाले आहे. विद्या आणि सिद्धार्थ या लग्नात खूप खुश आहे.
दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…
हेही नक्की वाचा-
-‘मला शिव्या देणे सोपे आहे, कारण मी एकटीच आहे, पण…’, अश्लील कंटेंट प्रकरणात गेहना वशिष्ठचे विधान
-करण जोहरला खूप सतावते मुलं यश- रुही यांच्याबद्दल ‘ही’ भीती; मुलाखतीत स्वत: केले उघड