Friday, April 18, 2025
Home टेलिव्हिजन ‘या’ प्रसिद्ध अभिनेत्रींसोबत जोडलं गेलंय सिद्धार्थ शुक्लाचं नाव; तर काजोलच्या बहिणीचाही आहे यादीत समावेश

‘या’ प्रसिद्ध अभिनेत्रींसोबत जोडलं गेलंय सिद्धार्थ शुक्लाचं नाव; तर काजोलच्या बहिणीचाही आहे यादीत समावेश

टेलिव्हिजनवरील लोकप्रिय अभिनेता म्हणजे सिद्धार्थ शुक्ला. ‘बिग बॉस 13‘ चा विजेता बनून त्याने ट्रॉफी त्याच्या नावी केली होती. त्यानंतर त्याची लोकप्रियता खूप वाढली आहे. बिग बॉसमध्ये असताना त्याच्या प्रेमळ स्वभावाने सर्वांचेच लक्ष वेधून घेतले होते. त्यावेळी तो त्याच्या अफेअरमुळे देखील खूप चर्चेत होता. अशातच आज त्याची पहिली पुण्यतीथी साजरी करत आहे. माध्यमातील वृत्तानुसार त्याचे नाव टेलिव्हिजनवरील अनेक प्रसिद्ध अभिनेत्रींसोबत जोडलेले होते.

शेफाली जरीवाला

‘बिग बॉस 13’ मध्ये शेफालीने वाइल्ड कार्ड एंट्री घेतली होती. माध्यमातील वृत्तानुसार, शोमधून बाहेर जाण्याआधी तिने सगळ्यांना हे सांगून हैराण केले होते की, तिने सिद्धार्थला डेट केले आहे.

दृष्टि धामी

टेलिव्हिजन अभिनेत्री दृष्टीने अनेक मालिकांमध्ये काम केले आहे. तिने ‘मधुबाला’, ‘दिल मिल गये’, ‘गीत’ यांसारख्या मालिकांमध्ये काम करून प्रेक्षकांच्या मनात तिची एक खास जागा निर्माण केली आहे. दृष्टी आणि सिद्धार्थची पहिली भेट ‘झलक दिखलाजा’च्या सेटवर झाली होती. त्यावेळी त्यांच्या अफेअरची खूप चर्चा रंगली होती. ते अनेकवेळा एकत्र स्पॉट होत असत. (Siddharth Shukla has dated many famous actress, Kajol’s sister is also include in list)

रश्मि देसाई

प्रेक्षकांना ‘बिग बॉस 13’ मध्ये सिद्धार्थ आणि रश्मीचे पुन्हा एकदा भांडण पाहायला मिळाले होते. ‘दिल से दिल तक’ या शोमध्ये ते दोघे एकमेकांच्या खूप जवळ होते. माध्यमातील वृत्तानुसार ते दोघे एकमेकांवर खूप प्रेम करत होते.

तनीषा मुखर्जी

काजोलची बहिण तनिषासोबत देखील सिद्धार्थला अनेक वेळा फिरताना पाहिले आहे. पण त्यांनी त्यांच्या नात्याचा खुलासा नाही केला.

शहनाझ गिल:

सिद्धार्थच्या चाहत्यांना त्याची आणि शहनाझ गिलची केमिस्ट्री खूप आवडते. ते नेहमीच त्यांचे रोमँटिक फोटो आणि व्हिडिओ प्रेक्षकांसाठी शेअर करत असतात.

सिद्धार्थला टेलिव्हिजन दुनियेतला ‘मोस्ट डिजायरेबल’ हा अवॉर्ड मिळाला आहे. यावरूनच आपण त्याच्या लोकप्रियतेचा अंदाज लावू शकतो.

दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सऍप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बोंबाबोंबचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही नक्की वाचा-
जगभरातील मॉडेल्सला हरवून सिद्धार्थ शुक्ला ठरला होता ‘वर्ल्ड्स बेस्ट मॉडेल’ स्पर्धा जिंकणारा पहिला भारतीय

बापरे! तब्बल ‘इतक्या’ कोटींची संपत्ती मागे सोडून गेला सिद्धार्थ शुक्ला; आकडा तर वाचाच

हे देखील वाचा