Friday, August 1, 2025
Home बॉलीवूड सिद्धार्थ शुक्लाने शहनाझ गिलच्या कुशीत घेतला अखेरचा श्वास? म्हणाली, ‘मी आता कसं जगू शकेन’

सिद्धार्थ शुक्लाने शहनाझ गिलच्या कुशीत घेतला अखेरचा श्वास? म्हणाली, ‘मी आता कसं जगू शकेन’

लोकप्रिय टीव्ही अभिनेता सिद्धार्थ शुक्लाच्या आकस्मिक निधनाने सर्वांनाच धक्का बसला आहे. सिद्धार्थ गेल्यानंतर त्याच्या चाहत्यांना शहनाझ गिलची काळजी वाटू लागली आहे. अभिनेत्री कोणत्या अवस्थेत आहे, हे प्रत्येकाला जाणून घ्यायचे आहे. काही काळापूर्वी तिच्या वडिलांचे एक विधान समोर आले आहे. ज्यात त्यांनी सांगितले की, शहनाझची प्रकृती ठीक नाही. तिच्या वडिलांनी सांगितले की, शहनाझ कशी रडली आणि म्हणाली की “पप्पा मी आता कसे जगू शकेन.”

माध्यमांतील वृत्तानुसार, सिद्धार्थ शुक्लाने शहनाझ गिलच्या कुशीमध्ये अखेरचा श्वास घेतला. शहनाझला याचा प्रचंड मोठा धक्का बसला आहे आणि ती हे सहन करू शकत नाही. तिचे वडील संतोख सिंग सुख फोनवर बोलत असताना म्हणाले की, “शहनाझची रडून- रडून हालत खराब झाली आहे. तिने मला म्हणाली की पप्पा, तो माझ्या कुशीत मरण पावला आहे.  हे जग त्याने माझ्या हातातच सोडले. आता मी काय करू, मी कसे जगू शकेन.”

शहनाज गिलच्या वडिलांना संपूर्ण घटना सांगताना म्हणाली की, जेव्हा ती सिद्धार्थला सकाळी उठवण्यासाठी त्याच्या खोलीत गेली, तेव्हा सिद्धार्थने काहीच प्रतिसाद दिला नाही. मग तिने त्याला कुशीत घेतले, त्यानंतरही सिद्धार्थकडून कोणताच प्रतिसाद आला नाही. मग तिने जवळ राहणाऱ्या सिद्धार्थच्या संपूर्ण कुटुंबाला बोलावले. त्यानंतर त्याला रुग्णालयात नेण्यात आले. शहनाझ म्हणते की, “तो नाहीये, तर मी कसे जगू शकेल.”

काही दिवसांपूर्वी सिद्धार्थ आणि शहनाझ ‘बिग बॉस ओटीटी’मध्ये एकत्र दिसले होते. त्यांनी ‘बिग बॉस ओटीटी’ होस्ट करण जोहरसोबत स्टेज शेअर केला. दोन्ही कलाकार १३ व्या सीझन दरम्यान ‘बिग बॉस’च्या घरात होते. जिथे त्यांचे नाते बहरले. जरी त्यांनी त्यांचे नाते कधीही अधिकृत केले नसले, तरी सिद्धार्थ आणि शहनाझची घट्ट मैत्री त्यांच्या चाहत्यांसाठी पुरेशी होती, जे त्यांना प्रेमाने ‘सिडनाझ’ म्हणत होते.

दैनिक बोंबाबोंचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-‘सिडनाझ’च्या नात्याबद्दल सिद्धार्थचा मित्र अबू मलिकने केला मोठा खुलासा, म्हणाला…

-पहाटेच्या ३ वाजता सिद्धार्थ शुक्ला झाला होता अस्वस्थ; आईला मागितले पाणी आणि म्हणाला…
-‘मी माझा मुलगा गमावला आहे’, सिद्धार्थच्या निधनावर प्रत्युषाच्या वडिलांनाही भावना अनावर

हे देखील वाचा