Friday, August 1, 2025
Home मराठी मितालीचे पटापट मुके घेत राहिला सिद्धार्थ, रोमँटिक Video पाहिलात का?

मितालीचे पटापट मुके घेत राहिला सिद्धार्थ, रोमँटिक Video पाहिलात का?

मराठी चित्रपट जगतात असे अनेक क्यूट कपल आहेत ज्यांच्या गोड लवस्टोरीची आणि गोड केमिस्ट्रीची नेहमीच चर्चा पाहायला मिळते.  त्यांच्या सोशल मीडिया पोस्टवरही त्यांचे चाहते जोरदार प्रतिक्रिया देत असतात. या गाजलेल्या कपलमध्ये मिताली मयेकर (Mitali Mayekar) आणि सिद्धार्थ चांदेकरचे (Sidharth Chandekar) नाव प्रामुख्याने घेतले जाते. दोघेही अनेकदा आपले फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट करत असतात ज्याची नेहमीच चर्चा रंगली असते. नुकताच अभिनेता सिद्धार्थ चांदेकरने एक गोड व्हिडिओ शेअर केला  आहे ज्यामध्ये तो मितालीच्या गालावर पटापट किस करताना दिसत आहे. या व्हिडिओवर चाहत्यांनीही भन्नाट प्रतिक्रिया दिल्या आहेत. 

अभिनेता सिद्धार्थ चांदेकरने त्याच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाउंटवरुन एक व्हिडिओ शेअर केला आहे ज्यामध्ये तो पत्नी मितालीला कवेत घेऊन बसल्याचे दिसत आहे. त्याचबरोबर तो तिला प्रेमाने जवळ घेत तिच्या गालावर पटापट किस करताना दिसत आहे. तर मितालीही त्याच्या या प्रेमाने थक्क झालेली दिसत आहे. मराठी चित्रपट जगतातील या सुंदर जोडीच्या प्रेमाचा हा भारी व्हिडिओ सध्या सर्वत्र व्हायरल होत आहे. अनेकांनी त्यांच्या या केमिस्ट्रीचे कौतुक केले आहे. या व्हिडिओवर चाहत्यांसह अनेक कलाकारांनीही प्रतिक्रिया दिल्या आहेत. यावेळी मोकळे केस सोडलेली मिताली खूपच मनमोहक दिसत आहे.

दरम्यान मिताली मयेकर आणि सिद्धार्थ चांदेकर दोघेही मराठी चित्रपट जगतातील लोकप्रिय अभिनेते आहेत. सिद्धार्थने २०१० मध्ये आलेल्या अवधूत गुप्तेच्या ‘झेंडा’ चित्रपटातून मराठी सिने जगतात पाऊल ठेवले होते.  त्याने अनेक मराठी तसेच हिंदी चित्रपटातही काम केले आहे तर अभिनेत्री मितालीनेही सिने जगतात स्वतःची एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. तिने २००९ मध्ये आलेल्या ‘बिल्लू’ चित्रपटातून आपल्या अभिनय कारकिर्दिला सुरूवात केली होती.  तिने ‘उर्फी’, ‘यारी दोस्ती’, ‘स्माईल प्लिज’ अशा गाजलेल्या चित्रपटात काम केले आहे.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

हेही वाचा- 

हे देखील वाचा