Monday, June 24, 2024

‘काहीतरी खास’ म्हणत कियारा अडवाणीने शेअर केले संगीत फंक्शनचे फोटो, दोघांचा लूक ठरला लक्षवेधी

अभिनेत्री कियारा अडवाणी आणि अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रा यांनी ७ फेब्रुवारी रोजी लग्न केले. राजस्थानमधील जैसलमेर येथील सूर्यगढ पॅलेसमध्ये त्यांनी अगदी मोजक्या लोकांच्या उपस्थितीत लगीनगाठ बांधली. त्यांनी त्यांचे लग्न मीडियापासून लांब केले. लग्नात होणारे सर्व कार्यक्रम त्यांनी मीडियापासून लांब केले. त्यामुळे त्यांच्या फॅन्सला आणि मीडियाला त्यांच्या प्रत्येक कार्यक्रमांचे फोटो मिळालेच नाही. मात्र आता लग्नला काही दिवस उलटल्यानंतर हे दोघेही त्यांच्या एक एक कार्यक्रमांचे फोटो शेअर करत आहे.

नुकतेच सिद्धार्थ आणि कियारा यांनी त्यांच्या लग्नाआधी झालेल्या संगीत फंक्शनचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. त्यांचे हे फोटो जोरदार व्हायरल होत असून, त्यांच्या फॅन्ससाठी तर हे फोटो एकप्रकारे ट्रीटच आहे. सिद्धार्थ आणि कियारा यांचे संगीत फंक्शन जोरदार गाजले होते. या फंक्शनचे काही व्हिडिओ धूसर सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. मात्र आता या दोघांनी त्यांच्या या फंक्शनचे अधिकृत फोटो शेअर केले आहे. संगीत फंक्शनमध्ये कियारा आणि सिद्धार्थ देखूपच स्टनिंग दिसत होते.

 

View this post on Instagram

 

A post shared by KIARA (@kiaraaliaadvani)

कियाराने तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून हे फोटो शेअर केले असून, त्यांच्या या फोटोवरून दोघांनी आणि आलेल्या सर्व पाहुण्यांनी हे फंक्शन चांगलेच एन्जॉय केल्याचे दिसत आहे. या फोटोमध्ये कियाराने मनः मल्होत्राने डिझाइन केलेला गोल्डन रंगाचा लेहेंगा घातलेला दिसत आहे. तर सिद्धार्थने पारंपरिक ब्लॅक अँड व्हाइट रंगाचा गोल्डन रंगाचा ड्रेस घातला आहे.

कियाराने शेअर केलेल्या फोटोंमध्ये ते रोमंटिक पोज देण्यासोबतच संगीत फंक्शन एन्जॉय करत डान्स करताना दिसत आहे. हे फोटो शेअर करताना कियाराने कॅप्शनमध्ये लिहिले, “त्या रात्रीत काही तरी खास..,खरंच काहीतरी खास” त्यांच्या या फोटोंवर फॅन्ससोबतच सेलिब्रिटींनी देखील कमेंट्स करत त्यांच्या लूकची आणि जोडीची स्तुती केली आहे.

याआधी कियारा आणि सिद्धार्थ यांनी व्हॅलेंटाइन डे चे औचित्य साधत त्यांच्या हळदीच्या कार्यक्रमाचे फोटो शेअर केले होते. या फंक्शनमध्ये दोघांनी पिवळ्या रंगाचे कपडे घालत ट्विनिंग केले होते. तत्पूर्वी सिद्धार्थ आणि कियाराने ७ फेब्रुवारी रोजी लग्न केले त्यानंतर सोशल मीडियावर फोटो पोस्ट केले होते.

हे देखील वाचा