Wednesday, July 3, 2024

कियारा आडवाणीसोबत रिलेशनच्या चर्चा चालू असताना, सिद्धार्थ मल्होत्राने सांगितले त्याचे लग्नाचे प्लॅन

बॉलिवूड अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रा हा त्याच्या वैयक्तिक आणि व्यावसायिक आयुष्यामुळे खूप चर्चेत आहे. ‘शेरशाह’ या चित्रपटानंतर तो प्रकाशझोतात आला. त्याच्या व्यावसायिक आयुष्यासोबतच वैयक्तिक आयुष्याबद्दल अनेक चर्चा चालू आहेत. चित्रपटात मुख्य भूमिकेत असणारी कियारा आडवाणी आणि त्याच्या रिलेशनबाबत चर्चा चालू झाल्या. त्यांची जोडी प्रेक्षकांना खूप आवडली. यानंतर आता सिद्धार्थ कधी लग्न करणार आहे याची सगळ्यांना उत्सुकता लागली आहे. अशातच सिद्धार्थने त्याच्या लग्नाबाबत वक्तव्य केले आहे.

एका मुलाखतीत सिद्धार्थला‌ त्याच्या लग्नाच्या प्लॅन्सबद्दल विचारण्यात आले. तेव्हा त्याने सांगितले की, “आता तरी लग्नाबाबत माझे काही प्लॅन नाहीये. मला असे वाटते की, ही एक अशी गोष्ट आहे, ज्याचा कोर्स आहे. ज्याचे प्रोडक्शन अजूनही झाले नाही. माझ्याकडे स्टोरी नाहीये. स्क्रिप्ट आणि कास्ट तयार आहे. आता कधी होणार आहे हे मला समजले की, मी सगळ्यांना सांगेल.” (Sidharth Malhotra on wedding plans says there are no plans right now)

‘शेरशाह’ या चित्रपटात सिद्धार्थ आणि कियाराची केमिस्ट्री सगळ्यांना खूप आवडली. दोघेही सोबत खूप छान दिसत होते. कियाराने देखील सिद्धार्थसोबत खूप वेळ घालवला आहे. ते दोघेही अनेकवेळा डिनरसाठी एकत्र जात असतात. तसेच ते दोघे एकमेकांच्या घरी देखील येत जात असतात. परंतु त्या दोघांनी अजूनही त्यांच्यात काही रिलेशन आहे यावर काही प्रतिक्रिया दिली नाही. परंतु त्यांच्या चाहत्यांना त्यांना एकत्र बघण्याची इच्छा आहे.

 

‘शेरशाह’ चित्रपटानंतर सिद्धार्थच्या करिअरमध्ये बदल आला आहे. त्याचे असे म्हणणे आहे की, ‘शेरशाह’ चित्रपटानंतर सगळे त्याच्याकडे सिरीयसली बघतात. त्याने सांगितले की, “यश हे तुमच्यात बदल घडवून आणते. ते तुमचा सेन्स ऑफ परफॉर्मन्स वाढवते. आता चित्रपटाबाबत दिग्दर्शकांशी बोलताना किंवा काही सांगतात माझ्यात आत्मविश्वास असतो.”

त्याने पुढे सांगितले की, “३ वर्षापूर्वी मी जर हेच मत दिले असते, तर त्यांनी विचार केला असता की, हे करू की नको. परंतु आता ते काम बघतात की, तुम्ही प्रेक्षकांशी किती कनेक्ट आहात. हा माझ्यासाठी एक सकारात्मक बदल आहे. मला हे म्हणायचे नाही की, मीचं सर्वोत्कृष्ट आणि मी या सगळ्या गोष्टी कंट्रोल करत आहे. मला फक्त एवढंच म्हणायचे आहे की, ट्राय करायला काही हरकत नाहीये.”

सिद्धार्थच्या आगामी चित्रपटांबाबत बोलायचे झाल्यास, तो ‘मिशन मजनू’, ‘थॅंक गॉड’ आणि धर्मा प्रोडक्शनच्या ‘अनटायटल ऍक्शन’ चित्रपटात दिसणार आहे. ‘मिशन मजनू’ या चित्रपटात त्याच्यासोबत रश्मिका मंदाना मुख्य भूमिकेत दिसणार आहे. ते दोघे पहिल्यांदाच मोठ्या पडद्यावर एकत्र दिसणार आहेत. ‘थॅंक गॉड’ या चित्रपटात त्याच्यासोबत रकुल प्रीत सिंग आणि अजय देवगण असणार आहे.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-सिद्धार्थ मल्होत्राला मिळाली चिमुकली कियारा आडवाणी, व्हिडिओ शेअर करत म्हणतोय…

-‘मी माझ्या हृदयाच्या जवळ ठेवते’, म्हणत सिद्धार्थ मल्होत्रासोबतच्या नात्याबद्दल बोलली कियारा

-‘शेरशाह’नंतर सिद्धार्थ मल्होत्राच्या आगामी ‘मिशन मजनू’ चित्रपटासाठी चाहते उत्सुक; साकारणार ‘ही’ भूमिका

हे देखील वाचा