‘शेरशाह’नंतर सिद्धार्थ मल्होत्राच्या आगामी ‘मिशन मजनू’ चित्रपटासाठी चाहते उत्सुक; साकारणार ‘ही’ भूमिका


बॉलिवूडमध्ये आजवर अनेक विषयांवर चित्रपट साकारण्यात आले आहेत. एक काळ होता जेव्हा सर्वत्र प्रेमाच्या व्याख्या सांगणारे अनेक चित्रपट साकारण्याचे काम सुरू होते. परंतु सध्या जागतिक पातळीवर सुरू असलेले अन्य देशांमधील वाद तसेच भारतातील सैनिकांवर होत असलेले हल्ले लक्षात घेता, देशभक्तीपर आधारित चित्रपटांची रांगच लागली आहे. अशात आपल्या भारतभूमीच्या रक्षणासाठी, तिरंग्यासाठी रात्रंदिवस काम करत असलेलं ‘रॉ एजंट’ यांच्या भूमिकेतील चित्रपट फार झळकत आहेत. अनेक अभिनेत्यांना ‘रॉ एजंट’ची भूमिका साकारण्याचे वेध लागले आहेत. मोठ्या पडद्यापासून ते छोट्या पडद्यापर्यंत तसेच डिजिटलच्या दुनियेमध्ये वेगवेगळ्या छटांमधून देशावरील विषयांवर चित्रपट साकारले जात आहेत.

सिद्धार्थ मल्होत्राच्या अभिनयाची, तर बातच और आहे. ‘शेरशाह’ या चित्रपटामधील त्याच्या भूमिकेने चाहत्यांना वेड लावले आहे. अशात आता रॉ एजंटची भूमिका साकारत तो लवकरच ‘मिशन मजनू’ या चित्रपटामध्ये झळकणार आहे. नुकतेच त्याने या चित्रपटाचे शूटिंग संपवले आहे. तसेच चित्रपटाची शूटिंग संपल्याच्या आनंदामध्ये या चित्रपटाच्या पूर्ण टीमने पार्टी करत आनंद व्यक्त केला आहे. ‘मिशन मजनू’ या चित्रपटाची चर्चा गेले अनेक दिवस सुरू आहे. चाहते या चित्रपटामध्ये रश्मिका मंदानाला पाहायला मिळणार म्हणून खूप उत्सुक आहेत. रश्मिकाचा हिंदी भाषिक हा पहिलाच चित्रपट आहे. (Sidharth Malhotra also played the role of RAW agent in next movie mission Majnu)

सुपरहिट चित्रपट ‘थडम’चा रिमेक सोडून सिद्धार्थ मल्होत्रा ‘मिशन मजनू’ला हजर
अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रा आपल्या दमदार अभिनयाने एकापेक्षा एक यशस्वी चित्रपट देण्यास सज्ज झाला आहे. अशात काही गोष्टींमुळे आपण अभिनयामध्ये कमावलेली प्रसिद्धी थोड्यासाठी जाऊ नये यामुळे त्याने तो चित्रपट सोडून ‘मिशन मजनू’मध्ये काम करायचे ठरवले. ‘थडम’ चित्रपटाच्या रिमेकमध्ये अभिनेता डबल रोल साकारणार होता. सगळीकडे याची चर्चा देखील सुरू झाली होती, पण जसे सिद्धार्थला समजले की, शाहरुख खान निर्मित इटलीतील एका चित्रपटाच्या कहाणीप्रमाणेच ‘थडम’ चित्रपटाची कहाणी आहे, तसे त्याने या चित्रपटाला राम राम ठोकला. या चित्रपटामध्ये आता अभिनेता आदित्य रॉय कपूर मुख्य भूमिकेमध्ये झळकणार आहे. यांनतर सिद्धार्थने ‘मिशन मजनू’वर आपला शिक्का मोर्तब केला.

सिद्धार्थच्या ‘शेरशहा’ या चित्रपटाने प्राईम व्हिडिओवर सर्वात जास्त विक्रम नोंदवला आहे. असाच विक्रम गेल्या वर्षी आयुष्मान खुराना आणि अमिताभ बच्चन यांच्या ‘गुलाबो सिताबो’ या चित्रपटाने केला होता. प्राईम व्हिडिओवर दिसणाऱ्या चित्रपटांची रेटिंग आयएमडीबीवर सध्या चांगली असते. कारण आयएमडीबी आणि प्राईम व्हिडिओ या दोन्ही ऍमेझॉन या एकाच कंपनीच्या शाखा आहेत. ‘मिशन मजनू’ चित्रपटामध्ये सिद्धार्थ एका ‘रॉ एजंट’ची उत्तम भूमिका साकारताना दिसणार आहे. ‘शेरशाह’मधील त्याचा अभिनय पाहून त्याच्या आगामी चित्रपटासाठी चाहत्यांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.

रॉनी स्क्रूवाला, अमर बुटाला आणि गरिमा मेहता यांच्या या चित्रपटाचे लेखन परवेज शेख, असीम अरोरा आणि सुमित बठेजा यांनी केले आहे. शांतनू बागची निर्मित ‘मिशन मजनू’ या चित्रपटामध्ये सिद्धार्थ आणि रश्मिकासह शारिब हाशमी आणि कुमुद मिश्रा देखील काही मुख्य पात्रांमध्ये दिसणार आहेत. चित्रपटाची शूटिंग पूर्ण झाल्याच्या आनंदात अमर बुटाला म्हणतात की, “अशा आव्हानात्मक काळामध्ये शूटिंग पूर्ण करून देखील आम्हाला आंनद आहे की, सिद्धार्थच्या वाटेचे शूटिंगचे काम आम्ही ठरवलेल्या वेळेमध्येच पूर्ण केले आहे.”

राज खोसला दिग्दर्शित चित्रपट ‘सीआयडी’पासून सुरू झालेली गुप्तहेरांचे मिशन आता ‘टायगर जिंदा है’पासून ‘टाइगर 3’ पर्यंत पोहोचले आहे. अक्षय कुमारच्या अशा प्रकारच्या चित्रपटांचा प्रवास ‘बेलबॉटम’पासून सुरू झाला. दिग्दर्शक नीरज पांडे यांनी या चित्रपटाआधी ‘बेबी’ आणि ‘नाम शबाना’मध्ये बाजी मारली आहे. तसेच शाहरुख खान त्याचा आगामी चित्रपट ‘पठाण’मध्ये गुप्तहेराच्या भूमिकेमध्ये दिसणार आहे. आमिर खान देखील बऱ्याच वर्षां आधी ‘सरफरोश’ या चित्रपटामध्ये देशा विरोधी तत्वांवर आवाज उठवताना दिसला आहे. जॉन अब्राहम ‘मद्रास कैफे’ आणि ‘रॉ’ या चित्रपटामध्ये अशी भूमिका साकारताना दिसला आहे. यामध्ये अभिनेत्री कंगना देखील मागे नाही, ती देखील तिच्या आगामी ‘धाकड’ या चित्रपटामध्ये गुप्तहेर म्हणून दिसणार आहे. या आधी प्रेक्षकांनी विद्या बालनला ‘कहाणी’ या चित्रपटामध्ये गुप्तहेराच्या भूमिकेमध्ये पहिले आहे. तसेच आलिया भट्ट देखील चित्रपट ‘राजी’मध्ये देशासाठी झटताना दिसली होती.

दैनिक बोंबाबोंचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-रिलायन्स एन्टरटेन्मेंट अन् टी- सीरिजमध्ये मोठी भागीदारी; हजारो कोटींच्या गुंतवणुकीतून बनवणार ‘हे’ १० चित्रपट

-‘आली गवर आली, सोनपावली आली…’, मानसी नाईकने जल्लोषात केले गौराईचे स्वागत

-जेव्हा पितृसत्तेचा विरोध करत मल्लिकाने झापले वडिलांना; म्हणाली होती, ‘तू मला जन्म दिलास म्हणून…’


Leave A Reply

Your email address will not be published.