Friday, November 22, 2024
Home बॉलीवूड ‘आलियाला किस करणे खूप कंटाळवाणे होते’, सिद्धार्थ मल्होत्राने सांगितला त्याच्या किसिंगचा अनुभव

‘आलियाला किस करणे खूप कंटाळवाणे होते’, सिद्धार्थ मल्होत्राने सांगितला त्याच्या किसिंगचा अनुभव

चित्रपट दिग्दर्शक आणि निर्माता करण जोहरने बॉलिवूड इंडस्ट्रीला अनेक तरुण कलाकार दिले आहेत. त्याचा ‘स्टुडंट ऑफ द इयर’ हा चित्रपट तुम्हाला आठवत असेल. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगलाच गाजला आणि या चित्रपटातून तीन नवीन कलाकारांनी इंडस्ट्रीत पदार्पण केले, जे आज आपल्या अभिनयाने बॉलिवूडवर राज्य करत आहेत. वरुण धवन (Varun Dhawan), आलिया भट्ट ( Alia Bhatt) आणि सिद्धार्थ मल्होत्रा (Sidharth Malhotra)  यांच्या अभिनयाची त्यावेळी खूपच चर्चा झाली होती. आजही प्रेक्षक तो सीन विसरू शकले नाहीत आणि चित्रपट हिट झाला होता, ज्यामध्ये सिद्धार्थसोबत आलियाचा जबरदस्त किसिंग सीन दिसला होता. मात्र या सीनमध्ये सिद्धार्थला आलियाला किस करताना मजा आली नाही असा त्यानेच खुलासा केला होता. काय आहे हे प्रकरण चला जाणून घेऊ.

अभिनेता सिद्धार्थ मल्होत्राने त्याच्या चित्रपटातील अनुभवाबद्दल अनेक खुलासे केले होते. फिल्मफेअरला दिलेल्या मुलाखतीत सिद्धार्थ मल्होत्राने स्वतः कबूल केले की, ‘स्टुडंट ऑफ द इयर’ चित्रपटात आलिया भट्टला किस करताना मजा आली नाही. याचे कारणही त्याने या मुलाखतीत सांगितले होते. ते म्हणजे त्यावेळी सिद्धार्थची इच्छा दीपिका पदुकोणला किस करण्याची होती. सिद्धार्थने 2014 मध्ये ही मुलाखत दिली होती आणि त्यावेळी तो बॉलिवूडच्या गंगूबाईलाही डेट करत होता. फिल्मफेअरला दिलेल्या मुलाखतीत सिद्धार्थ मल्होत्राला पडद्यावर “कोणाला किस करायला आवडेल?” असा प्रश्न विचारण्यात आला होता. या प्रश्नावर सिद्धार्थने लगेच ‘दीपिका पदुकोण असे उत्तर दिले होते. त्याचबरोबर लोकांना तो आणि मलाही आवडेल अशी इच्छाही व्यक्त केली होती.

यानंतर ‘स्टुडंट ऑफ द आर्ट’मध्ये “आलिया भट्टसोबत किसिंग सीन करण्याचा त्याचा अनुभव कसा होता?” असा पुढचा प्रश्न विचारण्यात आला. यावर सिद्धार्थ म्हणाला की “हा अनुभव खूपच ‘कंटाळवाणा होता. चित्रपटात माझा आणि आलियाचा किसिंग सीन हा एक विचित्र अनुभव होता. तो खूप तांत्रिक होता. सीनमध्ये, आम्हाला ओठ, डोके आणि नाक या प्रत्येक कोनाची काळजी घ्यावी लागली. जे काही काळानंतर कंटाळवाणे झाले.” बरेच दिवस डेटिंग केल्यानंतर आलिया भट्ट आणि सिद्धार्थ मल्होत्रा ​​वेगळे झाले. ब्रेकअपनंतर आलिया खूप नाराज होती. आज ती रणबीर कपूरची पत्नी आहे. सिद्धार्थसोबतचे तिचे ब्रेकअप झाल्यानंतर  तिने रणबीर कपूरसोबत लग्नगाठ बांधली.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

author avatar
Chinmay Remane

हे देखील वाचा