Wednesday, July 3, 2024

सिद्धार्थ मल्होत्राला मिळाली चिमुकली कियारा आडवाणी, व्हिडिओ शेअर करत म्हणतोय…

अभिनेता सिद्धार्थ मल्होत्राच्या ‘शेरशाह’ या चित्रपटाला प्रेक्षकांनी चांगलाच प्रतिसाद दिला होता. या चित्रपटात त्याने शहीद कॅप्टन विक्रम बत्रा यांची भूमिका साकारली होती. विक्रम बत्रा यांची भूमिका त्यांनी अतिशय उत्तमरीत्या साकारली. ‘शेरशाह’चे डायलॉगही खूप लोकप्रिय झाले आहेत. दरम्यान एक छोटी कियारा या चित्रपटातील डायलॉग बोलताना दिसली, जिला सिद्धार्थ मल्होत्राने स्वतः आपल्या चाहत्यांशी भेटवले आहे.

अलीकडेच सिद्धार्थ मल्होत्राने आपल्या सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये एक छोटी मुलगीसोबत ‘शेरशाह’मधील डायलॉग बोलताना दिसत आहे. ज्यामध्ये डिंपल चीमाचे डायलॉग बोलत ती विक्रम बत्रा म्हणजेत सिद्धार्थला विचारत आहे की, “तुला आर्मी जॉईन करायची आहे?” या छोट्या कियाराची डायलॉग बोलण्याची स्टाईल चाहत्यांना खूप आवडली आहे. (sidharth malhotra shared video with little kiara goes viral on social media)

या व्हायरल व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये सिद्धार्थने लिहिले की, “डिंपलच्या रूपात छोट्या कियाराला भेटा.” हा व्हिडिओ ११लाखपेक्षा जास्तवेळा पाहण्यात आला आहे. या व्हिडिओला चाहत्यांकडून मोठ्या संख्येने लाईक्स मिळत आहेत. हा व्हिडिओ बघितल्यानंतर अनेकांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. कियाराने यावर हार्ट इमोजी पोस्ट केला आहे, तर करण जोहरच्या प्रॉडक्शन हाऊसने व्हिडिओवर कंमेंट केली आणि लिहिले, ‘उफ ये दिल मांगे मोर.’

हा चित्रपट कारगिल युद्धातील वीर शहीद कॅप्टन विक्रम बत्रा यांच्या जीवनावर आधारित आहे. विष्णुवर्धन दिग्दर्शित या चित्रपटात अभिनेता सिद्धार्थ मल्होत्राने कॅप्टन विक्रम बत्रा यांची मुख्य भूमिका साकारली आहे. तर कियारा आडवाणीने विक्रम यांची प्रेयसी डिंपलचा रोल निभावला आहे. करण जोहरच्या धर्मा प्रोडक्शन्स कंपनीने या चित्रपटाची निर्मिती केली आहे.

कियारा आणि सिद्धार्थ हे जोडपे अलीकडेच ‘शेरशाह’ चित्रपटात दिसले होते. कियारा आणि सिद्धार्थ खऱ्या आयुष्यात डेट करत असल्याच्या बातम्या येत होत्या, पण जेव्हा हे दोघे एकत्र पडद्यावर दिसले होते, तेव्हा सगळेच वेडे झाले होते. चाहत्यांना कियारा आणि सिद्धार्थ यांना प्रत्यक्ष जीवनात एकत्र पाहायचे आहे. तसेच प्रेक्षक त्यांच्या जोडीची पुन्हा पडद्यावर आतुरतेने वाट पाहत आहेत.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-‘शेरशाह’नंतर सिद्धार्थ मल्होत्राच्या आगामी ‘मिशन मजनू’ चित्रपटासाठी चाहते उत्सुक; साकारणार ‘ही’ भूमिका

-‘शेरशाह’साठी कियाराने आकारले ‘इतके’ कोटी रुपये; तर सिद्धार्थनेही घेतले अभिनेत्रीच्या दुप्पट मानधन

-‘मी हा चित्रपट करून खूप मोठी चूक केली’, ‘शेरशाह’ चित्रपटातील ‘या’ अभिनेत्याचे धक्कादायक वक्तव्य

हे देखील वाचा