‘भावा आता थेट स्वर्गात भेटेल…’, सिद्धार्थ शुक्लाच्या मृत्यूवर असीम रियाझ भावुक

लोकप्रिय अभिनेता सिद्धार्थ शुक्ला याच्या मृत्यूने संपूर्ण चित्रपटसृष्टीला मोठा धक्का बसला आहे. त्या लोकांसाठी या बातमीवर विश्वास ठेवणे अधिक अवघड आहे, जे त्याच्या अगदी जवळ होते. टेलिव्हिजनवरील अनेक कलाकार त्याच्या मृत्यूवर शोक व्यक्त करत आहेत. तसेच त्याचे फोटो सोशल मीडियावर शेअर करून त्याला श्रद्धांजली अर्पण करत आहेत. त्याच्या मृत्यूनंतर विंदू दारा सिंग, हिमांशी खुराना, डॉली बिंद्रा, सौम्या टंडन यांसारख्या अनेक कलाकारांनी दुःख व्यक्त केले आहे. बिग बॉसच्या घरात त्याच्यासोबाबत राहणाऱ्या स्पर्धकांना आता सिद्धार्थ या जगात नाही, या गोष्टीवर विश्वास ठेवणे खूप अवघड होत आहे. सिद्धार्थच्या मृत्यूची बातमी ऐकताच त्याचा मित्र, मॉडेल आणि अभिनेता असीम रियाझ हा कूपर रुग्णालयात गेला होता.

बिग बॉसच्या घरात असताना सुरुवातीच्या काही दिवसांमध्ये असीम आणि सिद्धार्थमध्ये खूप चांगली मैत्री होती. परंतु एक वेळ अशी आली होती, जेव्हा त्या दोघांमध्ये वाद होण्यास सुरुवात झाली होती. अनेकवेळा सलमान खानने त्यांना चांगलेच सुनावले देखील होते. या शोनंतर दोघांचे मार्ग वेगळे झाले होते. त्यानंतर त्या दोघांचा एकमेकांशी काही संबंध आला नाही, पण आता सिद्धार्थच्या मृत्यूची बातमी ऐकताच असीम हैराण झाला आणि लगेच त्याच्या मित्राला भेटण्यासाठी हॉस्पिटलमध्ये गेला. (sidharth shukla death asim riaz at cooper hospital to meet actor’s family)

असीमने त्याच्या सोशल मीडिया अकाउंटवर सिद्धार्थसाठी एक पोस्ट केली आहे. असीमने सिद्धार्थ शुक्लाच्या मृत्यूवर लिहिले आहे की, “भावा आता थेट स्वर्गात भेटेल, देव तुझ्या आत्म्यास शांती देवो!”

बिग बॉसमध्ये असीम रियाझ आणि सिद्धार्थ शुक्लाची मैत्री खूप चर्चेत होती. पण काही दिवसांनी त्यांच्यामध्ये वाद होऊ लागले आणि ते दोघे एकमेकांचे दुश्मन बनले. बिग बॉसच्या फिनालेमध्ये ते दोघे एकमेकांच्या समोर होते, पण सिद्धार्थने हा शो जिंकला होता.

या शोमधून बाहेर आल्यानंतर शहनाझ आणि सिद्धार्थ अनेक ठिकाणी एकत्र दिसले होते, पण असीम आणि सिद्धार्थ बाहेर आल्यानंतर कधीच एकत्र दिसले नाही. शोमध्ये असताना सिद्धार्थने असीमला बाहेर गेल्यावर कधी मला दिसू नकोस, अशी धमकी दिली होती. कितीही शत्रुत्व असलं तरीही सुरुवातीला त्यांच्यामध्ये खूप चांगली मैत्री होती. असीम आज त्याच्या मित्राला खूप मिस करत आहे.

दैनिक बोंबाबोंचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-बिग ब्रेकिंग! सिद्धार्थ शुक्लाचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन

-बहीण आणि मेहुण्याने बेशुद्ध अवस्थेत सिद्धार्थला नेले होते रुग्णालयात; वाचा कोण आहे त्याच्या कुटुंबात

‘बिग बाॅस’ फेम सिद्धार्थ शुक्लाची काय होती शेवटची सोशल मीडिया पोस्ट?