Wednesday, October 15, 2025
Home टेलिव्हिजन सिद्धार्थ शुक्लाचा ब्रोकन बट ब्यूटीफुल 3 चा ‘तो’ व्हिडिओ पाहून नेटकरी म्हणाले, ‘धन्यवाद आठवणी ताज्या केल्याबद्दल’

सिद्धार्थ शुक्लाचा ब्रोकन बट ब्यूटीफुल 3 चा ‘तो’ व्हिडिओ पाहून नेटकरी म्हणाले, ‘धन्यवाद आठवणी ताज्या केल्याबद्दल’

टेलिव्हिजन इंडस्ट्रीमधील सुपरस्टार सिद्धार्थ शुक्लाने 2021 साली अचानक या जगाचा निरोप घेतला. त्याच्या अशा अचानक जाण्यामुळे कुटुंबासोबतच त्याच्या फॅन्सला मोठा धक्का बसला होता. आजही त्याच्या जाण्याचे दुःख त्याच्या फॅन्सच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसून येते. त्याचे फॅन्स आजही त्याची आठवण काढतात आणि सोशल मीडियावर विविध पोस्ट शेअर करताना दिसतात. यातच आता सोशल मीडियावर सिद्धार्थचा एक न पाहिलेला व्हिडिओ व्हायरल होत असून, हा व्हिडिओ पाहून त्याचे फॅन्स भावुक झाल्याचे दिसत आहे.

टेलिव्हिजन क्षेत्रातील हँडसम हंक म्हणून सिद्धार्थ शुक्ला ओळखला जायचा. आपल्या व्यक्तीमत्वाने आणि अभिनयाने त्याने लोकांच्या मनात एक वेगळेच स्थान निर्माण केले होते. मालिका, चित्रपट आणि वेबसिरीज अशा तिन्ही माध्यमातून त्याने त्याची एक वेगळी ओळख निर्माण केली. सध्या सोशल मीडियावर व्हायरल होणारा सिद्धार्थाचा व्हिडिओ हा त्याच्या पहिल्या वाहिल्या वेबसिरीजचा ब्रोकन बट ब्यूटीफुल 3 च्या सेटवरचा आहे. या व्हिडिओमध्ये सिद्धार्थ त्याच्या ब्रोकन बट ब्यूटीफुल 3 वेबसिरीजसाठी फोटोशूट करताना दिसत आहे.

सिद्धार्थची पहिली वेबसिरीज असणाऱ्या ब्रोकन बट ब्यूटीफुल 3 मध्ये त्याच्यासोबत सोनिया राठी मुख्य भूमिकेत होती. भलेही या सिरिजला प्रेक्षकांचा मिळताजुळता प्रतिसाद मिळाला असला तरी या दोघांची जोडी मात्र चांगलीच हिट झाली. आता याच वेबसिरीजशी संबंधित हा व्हिडिओ समोर आला आहे. हा व्हिडिओ पाहून सर्वच नेटकरी भावुक होत त्याची आठवण काढताना दिसत आहे. व्हिडिओमध्ये सिद्धार्थने केशरी रंगाचा टीशर्ट घातला असून तो एका आणि सोनियासोबत फोटोसाठी पोज देताना दिसत आहे. हा व्हिडिओ पाहून नेटकऱ्यांनी व्हिडिओ शेअर करणाऱ्याला धन्यवाद म्हटले असून, सिद्धार्थच्या आठवणी पुन्हा ताज्या झाल्याचे सांगितले आहे.

ऑगस्ट २०२१ मध्ये सिद्धार्थचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले होते. त्याच्या निधनामुळे बॉलिवूडपासून टेलिव्हिजनपर्यंत सर्वच लोकं हैराण होते. अतिशय फिट असणाऱ्या सिद्धार्थला हृदयविकाराचा झटका यावा हेच कोणाला पचत नव्हते.

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
अधिक वाचा-
मराठी चित्रपटसृष्टीतील दिग्गज कलाकारांचा एसटीमधील जुना फोटो शेअर करून सांगितला अनुभव
…आणि म्हणून सुपरस्टार भरत जाधवच्या करोडों रुपयांच्या महागड्या व्हॅनिटी व्हॅनमध्ये आहे टॅक्सीचा फोटो

हे देखील वाचा