Thursday, April 25, 2024

…आणि म्हणून सुपरस्टार भरत जाधवच्या करोडों रुपयांच्या महागड्या व्हॅनिटी व्हॅनमध्ये आहे टॅक्सीचा फोटो

मराठी मनोरंजन क्षेत्रातील सुपरस्टार म्हणून भरत जाधवला ओळखले जाते. भरतने मनोरंजाच्या सर्वच क्षेत्रात यशाचे शिखर गाठले. मालिका, चित्रपट, नाटकं यासर्वांमधे त्याने त्याच्या अभिनयाने स्वतःचे असे वेगळे आणि प्रभावी स्थान निर्माण केले. मराठीमध्ये भरत जाधव हे नावच पुरेसे आहे. भरत हा जितका ताकदीचा अभिनेता आहे, तितकाच किंबहुना त्याहुन जास्त तो भावनाप्रधान माणूस आहे. तो नेहमीच मुलाखतीमध्ये त्याच्या कुटुंबाबद्दल भरभरून बोलत असतो. भरतसाठी त्याचे कुटुंब सर्वात जवळचे आहे.

भरतने नुकतीच सोशल मीडियावर एक पोस्ट शेयर केली आहे. ही पोस्ट त्याने त्याच्या वडिलांबद्दल लिहिली असून, यात त्याने एक प्रसंग सांगितला आहे, जो वाचून प्रत्येक जणं नक्कीच भावनिक होईल. त्याने त्याच्या पोस्टमध्ये लिहिले, ” एकदा आमच्या टॅक्सीत काही प्रवासी बसले होते. त्यांना नाटकाच्या प्रयोगाला जायला उशीर होत होता म्हणुन ते प्रवासादरम्यान वडिलांशी हुज्जत घालत होते. अक्षरशः आई बहिणी वरून त्यांनी शिव्या दिल्या पण वडिल त्यांना एक अवाक्षरही न बोलता त्यांना नाट्यगृहावर सोडलं आणि शांतपणे निघून आले. रात्री घरी आल्यानंतर त्यांनी हा प्रसंग सांगितला.”

“ते प्रवासी ‘ऑल द बेस्ट’ च्या प्रयोगाला चालले होते! आपल्या मुलाच्या नाटकासाठी लोकं गर्दी करतायत. या एकाच गोष्टीसाठी त्यांनी तो अपमान मुकाट सहन केला. खूप रडलो होतो त्या दिवशी. सुदैवाने तेव्हा मला १०० रुपये नाईट मिळत होती. त्या दिवसापासून त्यांना टॅक्सी चालवणं आता बंद करा म्हणून सांगितलं. टॅक्सी चालवणं त्यांनी बंद केलं तरी ती टॅक्सी त्यांनी विकली नाही कारण त्यांना चिंता होती उद्या जर ह्याच एखाद नाटक नाही चाललं तर काय करणार. ज्या वेळेस मी पहिली लक्झरी कार ऑटोमॅटिक होंडा अकॉर्ड घेतली आणि त्यांना स्टीअरिंग वर बसवलं त्यावेळेस आम्हा दोघांनाही खुप भरून आलं होतं. त्यानंतर मी अनेक लक्झरी गाड्या घेतल्या. एमडब्लू,मर्सडीज एस क्लास,” असेही भरत पोस्टमध्ये पुढे म्हणाला. 

आपल्या व्हॉनिटी व्हॅनमधील फोटोबद्दल पुढे बोलताना भरत म्हणतो, “मला आनंद या गोष्टीचा आहे की त्यांच्या हयातीतच मी मला जेवढं शक्य होत ते सगळं सुखं त्यांना देऊ शकलो. अर्थात त्यांच्या आशीर्वादाच्या पाठबळावरच मी हा प्रवास केलाय. आजही माझ्या व्हॅनिटी व्हॅनमध्ये आमच्या त्याच टॅक्सीचा फोटो मी लावलेला आहे. अण्णा… आज तुम्हाला खुप मिस करतोय. तुमच्या सारखा देव माणुस मी आयुष्यात पाहिला नाही.”

भरत जाधवचे वडील गणपत हरी जाधव यांचे 2017 साली हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने कोल्हापुरात निधन झाले. त्यांनी मुंबई येथे अनेक वर्षे टॅक्सी ड्रायव्हर म्हणून काम केले होते. अतिशय प्रतिकूल परिस्थितीत त्यांनी कुटुंबाचा उदरनिर्वाह केला.

भरतने आजवर अनेक गाजलेल्या भूमिका केल्या आहेत. त्याने8500नाटकांचे प्रयोग आजपर्यंत केले आहेत. शिवाय 85 चित्रपट आणि काही मालिकांमध्ये काम केले आहे. त्याने त्याच्या आयुष्यात खूप यश पहिले पण तरीही तो कधीच यशाने हुरळून गेला नाही. भरतने त्याच्या ‘सही रे सही’ नाटकाचे एका वर्षात 565 प्रयोग केले होते हा एकप्रकारचा विक्रमच होता. म्हणून त्याची या विक्रमासाठी गिनीज बुकमध्ये नोंद देखील झाली होती.

अधिक वाचा-
परमसुंदरी..! सई ताम्हणकरचा शॉर्ट ड्रेसमध्ये हॉट अंदाज, पाहा फोटो
नाटकांचा राजा समजल्या जाणाऱ्या भरत जाधवने चित्रपट पाहताना केला होता प्रियसीकडे प्रेमाचा खुलासा

हे देखील वाचा