पंजाबी गायक आणि काँग्रेस नेता सिद्धू मुसवाला (Sidhu Moosewala) याची शनिवारी (२९ मे) गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. या हत्येच्या प्राथमिक तपासात गँगस्टर लॉरेन्स बिश्नोईचे नाव पुढे येत आहे. पंजाबचे पोलीस महासंचालक व्ही के भावरा यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सिद्धू मूसवाला हत्याकांडात लॉरेन्स बिश्नोई आणि कॅनडास्थित गँगस्टर लकी उर्फ गोल्डी बरार यांचा थेट सहभाग असल्याचे थेट सांगितले आहे. आता प्रश्न पडतो की, लॉरेन्स बिश्नोई कोण आहे आणि त्याचा सलमान खानशी (Salman Khan) काय संबंध? चला जाणून घेऊया…