‘बिग बॉस 16’ मधील स्पर्धक अब्दू रोजिक याला शोमधून बाहेर काढण्यात आले असले तरी त्याची क्रेझ प्रेक्षकांमध्ये कायम आहे. ताजिकिस्तानमधून सुरू झालेल्या भारतीय रिऍलिटी शोचा एक भाग बनून आपल्या एक्टिविटीने प्रेक्षकांची मने जिंकणे अब्दूकडून शिकले पाहिजे. दरम्यान, अब्दुच्या चाहत्यांसाठी आणखी एक आनंदाची बातमी समोर आली आहे. भारतीयांची मने जिंकल्यानंतर अब्दूने आता एका इंटरनॅशनल प्रोजेक्ट साइन केल्याचे सांगितले जात आहे. रिपोर्टनुसार, अब्दू आता ‘बिग ब्रदर यूके’मध्ये दिसणार आहे.
माध्यमातील वृत्तानुसार, अब्दू रोझिक (abdu rozik) याला ‘बिग ब्रदर यूके’ शोची ऑफर मिळाली असून त्यांनी त्यात सहभागी होण्यास होकारही दिला आहे. जून किंवा जुलैपर्यंत तो या शोसाठी रवाना होईल. रिपोर्ट्सनुसार, ‘बिग ब्रदर यूके’ पाच वर्षांनंतर पुन्हा नव्या सीझनसह परतत आहे.
View this post on Instagram
अब्दु रोजिकला त्याच्या व्यावसायिक कारणांमुळे ‘बिग बॉस 16’ मधून बाहेर काढण्यात आले होते. शोमध्ये येण्यापूर्वी त्याने त्याच्या कोणत्यातरी प्रोजेक्टसाठी होकार दिला होता. अशा परिस्थितीत त्याने शो मध्येच सोडण्याचा निर्णय घेतला. शो सोडल्यानंतर अब्दूचे एक गाणे रिलीज झाले आहे.
View this post on Instagram
शोमध्ये, 19 वर्षीय अब्दू त्याच्या गोंडस लूक आणि प्रेमळ वागण्यामुळे लोकांच्या पसंतीस उतरला होता. शोमध्ये त्याने शिव ठाकरे, साजिद खान, एमसी स्टेन, सुंबुल ताैकीर आणि निमृत कौर अहलुवालिया यांच्याशी जवळचे नाते निर्माण केले. अब्दू हा मुळचा ताजिकिस्तानचा आहे. ताे त्यांच्या गायन शैलीमुळे सिनेसृष्टीत प्रसिद्ध आहे. अब्दूची गाणी अनेकदा सोशल मीडियावर माेठ्या प्रमाणात व्हायरल होतात. पारंपारिक गाण्यांव्यतिरिक्त अब्दू हिंदी गाणीही गातो. इंस्टाग्रामवर त्याचे 7.2 मिलियन पेक्षा जास्त फॉलोअर्स आहेत. महत्वाचं म्हणजे तो सलमान खानच्या आगामी ‘किसी का भाई किसी की जान’ या चित्रपटाचाही एक भाग आहे.(singer abdu rozik finalised for big brother uk after bigg boss 16 )
दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
सनी लिओनीचा कातिलाना अंदाज, फोटो गॅलरी फक्त तुमच्यासाठी
‘काकू सारखी दिसते आता…’ ऐश्वर्या राय झाली ‘या’ कारणासाठी सोशल मीडियावर ट्रोल