Friday, July 12, 2024

अब्दू रोजिकचा शत्रू हसबुल्ला येणार बिग बॉसमध्ये, लवकरच होणार वाईल्ड कार्ड एन्ट्री

बिग बॉस हा टेलिव्हिजनवरील सर्वांत वादग्रस्त शो म्हणून ओळखला जातो. बिग बॉस 16(Bigg Boss 16) धमाकेदार सुरुवातीनंतर हा शो सतत ट्रेंडमध्ये आहे. सलमान खानचा शो टीआरपी चार्टमध्येही वेगाने वाढतचं आहे. बिग बॉस 16 सुरु होऊन तीन आठवडे उलटले आहेत. आता शोमध्ये वाईल्ड कार्ड एन्ट्रीचा होण्याची शक्यता सांगितली जात आहे. अशा स्थितीत चर्चा सुरु आहे की, शोमध्ये पहिला वाईल्ड कार्ड कोण असणार आहे? आतापर्यंत या शोमध्ये वाईल्ड कार्डसाठी अनेक कलाकारांचे नावे समोर आली आहेत, मात्र वाईल्ड कार्डच्या रुपात कोण येणार हे अजून स्पष्ट झालेले नाही.

दरम्यान, काही दिवसांपूर्वी अशी बातमी आली होती की अब्दू रोजिक(abdu rozik) याचा शत्रू हसबुल्लाह मागोमेदोद (hasbullah magomedoy) शोमध्ये वाईल्ड कार्ड म्हणून एन्ट्री घेऊ शकतो आणि जर निर्मात्यांनी हे पाऊल उचलले तर शोचा टीआरपी झपाट्याने वाढेल यात शंका नाही. कारण, अब्दू हा चाहत्यांचा या सीझनमधील सर्वांत आवडता स्पर्धक आहे. अशा स्थितीत त्याची आणि हसबुल्लाह यांच्यातील लढत पाहण्यासाठी सर्वांनाच उत्सुकता वाटेल.

पण माध्यमांच्या वृत्तांवर विश्वास ठेवला तर हसबुल्लाला शोमध्ये सहभागी होण्यासाठी त्याला थोडा वेळ लागू शकतो. यामागे अनेक कारणंही आहेत. यातील पहिले कारण म्हणजे हसबूल्ला दुबईत राहतो. त्यामुळे निर्माते त्याला लवकरात लवकर शोमध्ये आणण्याचा प्रयत्न करत आहेत. हसबुल्लाहला हिंदी येत नसनसल्याचीही एक मोठी समस्या आहे. या सर्व कारणामुळे त्याला शोमध्ये एन्ट्री घेण्यासाठी वेळ लागू शकतो. जर हसबुल्लाने बिग बॉसच्या घरात एन्ट्री केली तर चाहत्यांना या दोघांचीही जोरदार टक्कर पाहायला मिळणार.

अशा परिस्थितीत आता या शोमध्ये वाईल्ड कार्ड म्हणून कोण एन्ट्री घेतंय असा प्रश्न उपस्थित होत आहे. माध्यमांच्या वृत्तांनुसार, दिवाळीच्या पुढच्या आठवड्यात श्रीजिता डे पुन्हा एकदा वाईल्ड कार्डच्या रुपात शोमध्ये परत येऊ शकते. शो सोडणारा पहिला कोण होता. शोशी संबंधित एका सूत्राने ही माहिती दिली आहे. सूत्राचे म्हणणे आहे की निर्मात्यांना वाटते की अभिनेत्री हुशार आहे, परंतु त्यांना शो नीट समजून घेण्याची संधी मिळाली नाही. त्यामुळेच त्याला पुन्हा एकदा शोमध्ये आणले जाऊ शकते. श्रीजीता डे ही यंदाच्या सीजनची पहिली एलिमिनेट झालेली स्पर्धक होती.

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
बाहुबली सिनेमातील प्रभासचा रोल मिळाला होता ‘या’ बॉलीवूड अभिनेत्याला, भूमिका करण्यास नकार देत…
वजन वाढविण्यासाठी एकावेळी तब्बल ४० अंडी खायचा प्रभास, ‘बाहुबली’साठी २०० कोटींच्या ऑफरलाही केलं बाय बाय

हे देखील वाचा