Thursday, June 13, 2024

अदनान सामीने कसे कमी केले होते 130 किलो वजन? 51 वर्षीय गायकाने स्वत:च केला खुलासा

बॉलिवूडमध्ये एकापेक्षा एक गायकांची रांग लागलेली आहे. या गायकांना आज कोणत्याही परिचयाची गरज नाहीये. त्यांनी एकापेक्षा एक सुपरहिट गाणे दिले आहेत. या गायकांमध्ये गायक आणि कंपोझर अदनान सामी याच्या नावाचाही समावेश होतो. अदनानच्या गाण्यांना चाहत्यांचे प्रचंड प्रेम मिळते. याव्यतिरिक्त अदनान त्याच्या वाढलेल्या वजनामुळेही जबरदस्त चर्चेत होता. काही वर्षांपूर्वी अदनान सामीचे ट्रान्सफॉर्मेशन पाहून अनेकांच्या भुवया उंचावल्या होत्या. आता त्याने त्याच्या 130 किलो वजन कमी करण्याच्या प्रवासाबद्दल सांगितले आहे. यासोबतच त्याने स्पष्ट केले आहे की, त्याने वजन कमी करण्यासाठी कोणत्याही सर्जरीचा आधार घेतला नाहीये.

अदनान सामीने सांगितले, कसे केले वजन कमी
एका मुलाखतीदरम्यान, 51 वर्षीय अदनान सामी (Adnan Sami) याने सांगितले की, कशाप्रकारे त्याने पोषणतज्ञांच्या मदतीने आपले वजन कमी केले. यामुळे त्याला डायट कमी करण्यासाठी नाही, तर लाईफस्टाईलमध्ये बदल करण्यास सांगितले. माध्यमांशी बोलताना अदनान सामी म्हणाला की, “यावर खूप जास्त प्रश्न उठतात की, मी माझे वजन कमी कसे केले. लोक म्हणतात की, त्याने सर्जरी केली, लिपोसक्शन केले, पण मी असे काहीच केले नाही.”

डॉक्टरांनी दिले होते 6 महिन्यांचे अल्टीमेटम
पुढे बोलताना अदनान सामी म्हणाला की, “माझे वजन 230 किलो इतके होते. लंडनमध्ये एका डॉक्टरांनी मला अल्टीमेटम दिले होते. त्यांनी मला म्हटले की, ज्याप्रकारे तू तुझं आयुष्य जगत आहे, जर तुझ्या पालकांना तू पुढील सहा महिन्यात हॉटेलच्या खोलीत मृत अवस्थेत सापडला, तर मला आश्चर्य वाटणार नाही. माझे वडील हे सर्व ऐकत होते. त्यावेली त्यांनी मला खूपच भावूक गोष्ट सांगितली.”

वजन कमी करण्याचे वडिलांना दिले वचन
वडील म्हणाले की, “तुला जे काही सहन करावे लागत आहे, ते मी सर्वकाही सहन केले आहे. मी प्रत्येक सुख-दु:खात तुझ्यासोबत राहिलो आहे. मी तुझ्याकडून कधीच काही मागितले नाही, परंतु माझी फक्त एकच विनंती आहे, तुला मला दफन करावे लागेल. मी तुला दफन करू शकत नाही. कुठल्याही वडिलाला त्याच्या मुलाला दफन करावे लागले नाही पाहिजे.” वडिलांचे बोलणे ऐकल्यानंतर अदनान सामीने त्यांना वचन दिले होते की, तो आपले वजन कमी करेल. तो म्हणाला होता की, “मी टेक्सासला गेलो आणि तिथे मी एका पोषणतज्ञांना शोधले. त्यांनी माझी लाईफस्टाईल पूर्णपणे बदलली. त्यांनी मला म्हटले की, मला संपूर्ण आयुष्य हीच लाईफस्टाईल फॉलो करावी लागेल.”

 

View this post on Instagram

 

A post shared by ADNAN SAMI (@adnansamiworld)

अदनान सामी याच्या गाण्यांबद्दल बोलायचं झालं, तर त्याने अनेक गाणी गायली आहेत. त्यात ‘सुन जरा’, ‘तेरा चेहरा’, ‘भीगी भीगी रातों में’, ‘मेरी याद रखना’, ‘शायद यही तो प्यार है’, ‘ओ मेरी जान’ यांसारख्या गाण्यांचा समावेश आहे, ज्यांना तुफान प्रसिद्धी मिळाली आहे. (Singer adnan sami reveals his weight loss journey he lost 130 kg)

दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सऍप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बोंबाबोंबचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
‘आम्ही आवाहन करतो की, चाहत्यांनी…’, पंतला भेटल्यानंतर बॉलिवूड दिग्गजांची कळकळीची विनंती
‘या’ 5 दिग्गजांनी 2022मध्ये कायमची एक्झिट घेत चाहत्यांना केले पोरके, यादीत लता दीदींचाही समावेश

हे देखील वाचा