×

एका वर्षात १८० गाणी तयार करून बप्पी दा यांनी केला विश्वविक्रम, नेहमी ‘ही’ खास गोष्ट घालायचे हातात

ज्येष्ठ गायक आणि संगीतकार बप्पी लहरी (Bappi Lahiri) यांचे वयाच्या ६९ व्या वर्षी निधन झाले. ८० आणि ९०च्या दशकातील त्यांची गाणी आजही प्रेक्षकांना नाचायला भाग पाडतात. त्यांचे ‘डिस्को डान्सर’ हे गाणे आजही चाहत्यांच्या जिभेवर आहे. बप्पी दा हे केवळ उत्तम कलाकारच नव्हते. त्यांचे व्यक्तिमत्वही खूप मनोरंजक होते. बप्पी दा यांनी संगीत जगतात खूप महत्त्वाचे योगदान दिले आहे. एकदा ते कपिल शर्मा (Kapil Sharma) शोमध्ये पाहुणे म्हणून गेले होते. त्यानंतर त्यांनी त्यांच्या आयुष्याशी संबंधित किस्से शेअर केले.

शो दरम्यान बोलत असताना बप्पी दा म्हणाले होते की, त्यांनी वयाच्या तिसऱ्या वर्षी तबला शिकायला सुरुवात केली आणि वयाच्या ११व्या वर्षी त्यांनी गाणी रचायला सुरुवात केली. इतकेच नाही, तर बप्पी दा केवळ १९ वर्षांचे होते, तेव्हा ते कोलकाताहून मुंबईत आले होते. कारण त्यांना चित्रपटांमध्ये रस होता. मुंबईत आल्यानंतर दिग्दर्शक शोमू मुखर्जी यांनी बप्पी लहरी यांना ‘नन्हा शिकारी’मध्ये संधी दिली.

View this post on Instagram

A post shared by Bappi Lahiri (@bappilahiri_official_)

अमृतसरच्या सुवर्णमंदिराचा कडा नेहमी घालायचे हाता
बप्पी दा यांना सोने घालण्याची खूप आवड होती. हे जवळपास सर्वांनाच माहीत आहे. त्यांनी शो दरम्यान सांगितले होते की, ते नेहमी हातात सुवर्ण मंदिरातून आणलेला कडा घालतात. ‘जखमी’ हा चित्रपट हिट झाला, तेव्हा त्यांच्या आईने हा कडा त्यांना घातला होता. बप्पी दा हा लकी कडा मानत आणि नेहमी घालत असे.

View this post on Instagram

A post shared by Bappi Lahiri (@bappilahiri_official_)

मायकल जॅक्सनही होता बप्पी यांच्या गाण्यांचा चाहता
शोमध्ये बोलत असताना, बप्पी दा यांनी आणखी एक किस्सा सांगितला की, एकदा ते एका कार्यक्रमादरम्यान मायकल जॅक्सनला भेटले होते. तेव्हा मायकल जॅक्सनच्या गळ्यात गणपतीचे लॉकेट पाहून बप्पी दा यांनी त्याचे कौतुक केले होते. यानंतर, जेव्हा त्यांनी मायकल जॅक्सनला सांगितले की, मी डिस्को डान्सरचा संगीतकार आहे. तेव्हा मायकलने सांगितले की, त्याला ‘जिमी-जिमी’ हे गाणे देखील आवडले आहे.

View this post on Instagram

A post shared by Bappi Lahiri (@bappilahiri_official_)

गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंदवले गेले
बप्पी यांनी ४८ वर्षे इंडस्ट्रीवर राज्य केले आणि त्यांच्या कारकिर्दीत ५००० हून अधिक गाणी संगीतबद्ध केली. १९८६ मध्ये त्यांनी केवळ एका वर्षात ३३ चित्रपटांसाठी १८० गाणी रेकॉर्ड केली होती. या कामगिरीबद्दल त्यांचे नाव गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्येही नोंदवले गेले

हेही वाचा :

हेही पाहा-

 

Latest Post