हॉलिवूड पॉप गायिका ब्रिटनी स्पीयर्स हिने संरक्षकत्व आणि वन टाईम मॅनेजमेंट टीमवर आगपाखड केली आहे. ग्रॅमी पुरस्कार विजेती ब्रिटनी हिने धक्कादायक खुलासा केला आहे. तिने सांगितले की, मागील 14 वर्षांपासून तिच्या टीममधील लोक तिच्याशी कसा व्यवहार करत आहेत. तसेच, तिने असेही आरोप लावलेत की, तिच्या सिक्युरिटीने तिला तिच्याच घरात नग्न अवस्थेत पाहिले. विशेष म्हणजे, कधी कपडे बदलताना, तर कधी अंघोळ करतानादेखील तिच्यावर नजर ठेवायचे.
ब्रिटनी स्पीयर्स (Britney Spears) हिने असेही सांगितले की, जेनिफर लोपेझ (Jennifer Lopez) हिच्यासोबत कधीही असा व्यवहार केला जाणार नाही, जसा तिच्यासोबत करण्यात आला आहे. सोमवारी (दि. 26 सप्टेंबर) 40 वर्षीय ब्रिटनीने तिच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाऊंटवर पोस्ट शेअर केल्या आहेत. यामध्ये ती म्हणाली की, “कुणीतरी जेनिफर लोपेझला आठवड्यात सात दिवस आठ तास एका ठिकाणी बसायला सांगावे, असे मला वाटते. कोणत्याही कारमध्ये नाही. मी एका मॅनेजमेंट टीमला जेनिफर लोपेझशी हे म्हणताना पाहू इच्छिते की, मी कोणत्या परिस्थितीतून गेली आहे. तुम्हाला काय वाटते की, ती काय करेल? तिचे कुटुंबीय कधीच याची परवानगी देणार नाहीत.”

गोपनीयता आणली संपुष्टात
ब्रिटनी स्पीयर्स हिने तिच्या पोस्टमध्ये पुढे लिहिले की, “मला दीर्घ काळापासून सिक्युरिटी टीमने घरात राहण्याच्या सूचना दिल्या होत्या. माझी गोपनीयता संपुष्टात आणली होती. मला खोलीचे दरवाजेही उघडे ठेवावे लागायचे. सिक्युरिटी टीम मला नग्न आणि अंघोळ करताना पाहू शकत होती.” पुढे तिने खुलासा केला की, “मला जे हवं होतं, ते 14 वर्षे नाकारण्यात आलं. ही माझ्यासाठी बर्बादी होती.”
View this post on Instagram
कुटुंबाने 4 महिने ठेवले होते बंद
ब्रीटनीने पुढे लिहिले की, “परंतु हे सर्वात वाईट नव्हते. सर्वात वाईट गोष्ट ही होती की, माझ्या कुटुंबाने मला त्या जागेवर चार महिन्यांसाठी बंद केले होते.” ब्रिटनीने आपली ही पोस्ट आता इंस्टाग्रामवरून हटवली आहे. तिने त्यावेळी म्हटले होते की, तिची औषधेही बंद करण्यात आली होती. तसेच, तिला लिथियमच्या नशेत बुडवले होते. यामुळे ती इंडस्ट्रीतून बाहेर पडली.
दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्त्वाच्या बातम्या-
मानलं भावा तुला! रश्मिकापुढे शर्टची बटणे काढून चाहत्याने मागितला ऑटोग्राफ, लाजून लाल झाली अभिनेत्री
लाजीरवाणे! साऊथच्या प्रसिद्ध अभिनेत्याचं न शोभणारं कृत्य; मुलाखतीवेळी कॅमेरा बंद करून महिला एँकरला…