Sunday, October 1, 2023

प्रसिद्ध गायक दलेर मेहंदीला अटक, २ वर्षांचा तुरुंगवास कायम

कलाविश्वातून मोठी बातमी समोर येत आहे. प्रसिद्ध पंजाबी गायक दलेर मेहंदी यांना अटक करण्यात आली आहे. पोलिसांनी त्यांना मानवी तस्करी प्रकरणी अटक केली आहे. पंजाबच्या पटियाला सत्र न्यायालयाने मानवी तस्करी प्रकरणी त्यांची तुरुंगवासाची शिक्षा कायम ठेवली आहे.

त्यांच्यावर आरोप आहे की, त्यांनी बेकायदेशीर पद्धतीने लोकांना परदेशात पाठवले आहे. याआधी पटियालाच्या न्यायदंडाधिकारी न्यायालयाने गायक दलेर मेहंदी (Daler Mehndi) यांना दोन वर्षांचा तुरुंगवास आणि २ हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली होती.

खरं तर, दलेर मेहंदी आणि त्यांचा भाऊ शमशेर सिंग यांच्यावर लोकांना त्यांच्या गटाचे सदस्य म्हणून बेकायदेशीरपणे परदेशात पाठवण्यासाठी मोठ्या प्रमाणात पैसे घेतल्याचा आरोप आहे. २०१८मध्ये, दोन्ही भावांना न्यायिक दंडाधिकारी प्रथम वर्ग न्यायालयाने दोषी ठरवून दोन वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली, त्यानंतर त्यांना जामीन मंजूर करण्यात आला होता. पुढे त्यांनी सत्र न्यायालयात अपील केली होती. अशात गुरुवारी (दि. १४ जुलै) अतिरिक्त सत्र न्यायाधीश एचएस ग्रेवाल यांच्या न्यायालयाने दलेर यांच्या जामीनाची याचिका फेटाळली. त्यानंतर त्यांना अटक करण्यात आली.

काय आहे प्रकरण?
सन २००३ मध्ये सदर पोलिस स्टेशनमध्ये दाखल करण्यात आलेल्या एफआयआरनुसार, मेहंदी बंधूंनी १९९८ आणि १९९९ मध्ये दोन गट घेतले होती, यादरम्यान १० लोकांना या गटाचे सदस्य म्हणून अमेरिकेला नेण्यात आले होते. तसेच, बेकायदेशीरपणे ‘सोडले’ असल्याचा आरोप त्यांच्यावर लावण्यात आला होता. अभिनेत्री करिश्मा कपूर आणि तिची आई बबिता यांच्यासोबत अमेरिकेच्या दौऱ्यावर गेलेल्या दलेरने सॅन फ्रान्सिस्कोमध्ये तीन मुलींनाही ‘सोडले’ होते. त्या मुलींची ओळख गुजरातमधील मुली सांगितली होती.

दलेर मेहंदी यांच्याबद्दल थोडक्यात
दलेर मेहंदी यांचे खरे नाव दलेर सिंग आहे. ते एक भारतीय गायक, गीतकार, लेखक आहेत. त्यांनी ‘भांगडा’ हा जगभरात लोकप्रिय करण्यात मदत केली आहे. त्यांच्याबाबत महत्त्वाची बाब अशी की, ते काजोलसोबत ‘कुछ खट्टी कुछ मेथी’ या सिनेमातून नायक म्हणून पदार्पण करणार होते. मात्र, जेव्हा करार पूर्ण झाला नाही, तेव्हा सिनेमातून त्यांचे पात्र काढून टाकले होते.

दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सऍप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

दैनिक बोंबाबोंबचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

हेही वाचा-

अभिनेत्री सान्या मल्होत्राच्या हॉट फॉटोशूटने नेटकरी झाले क्लिनबोल्ड, बिकिनी लूकने केले चाहत्यांना घायाळ

‘लव्हबर्ड्स’ करण अन् तेजस्वीचे नवीन गाणे रिलीझ, दोघांच्या रोमँटिक केमिस्ट्रीने वेधले सर्वांचे लक्ष

टायगर श्रॉफला जोराची लागली, तरीही भावाने सोडला नाही डान्स; व्हिडिओत दिसला अभिनेत्याचा संघर्ष

हे देखील वाचा