गायक कुमार सानू यांचा ‘इंडियन आयडल १२’ला पाठिंबा; म्हणाले, ‘मी पण शोमध्ये जाऊन आलो…’

Singer kumar sanu share his experience about Indian ideol show in his interview


टेलिव्हिजनवरील ‘इंडियन आयडल 12’ हा शो खूपच चर्चेत आहे. यामध्ये रोज काही ना काही नवीन घडत असते. किशोर कुमार यांचा मुलगा अमित कुमार यांनी बाहेर जाऊन या शोबद्दल खूप चर्चा केली. त्यांनी सांगितले की, या शोमध्ये त्यांना सर्व स्पर्धकांचे कौतुक करण्यास सांगितले होते. यांनतर या शोबाबत खूप चर्चा वाढू लागली. अभिजित सावंतने या शोबाबत त्याचे मत व्यक्त केले होते. तसेच सुनिधी चौहानने देखील सांगितले की, शो मधील स्पर्धकांचे तिला खोटे कौतुक करण्यास सांगितले होते. सोनू निगमने देखील आपली प्रतिक्रिया दिली होती. अशातच आता कुमार सानू यांनी या शोचे समर्थन केले आहे.

ते म्हणाले की, “असं काहीच होत नाही. मी पण या शोमध्ये जाऊन आलो आहे.” यानंतर पुन्हा एक चर्चा चालू झाली आहे. मागील दिवसात कुमार सानू आणि अनुराधा पौडवाल हे दोघेही शोमध्ये मुख्य पाहुणे म्हणून गेले होते. त्या दोघांनी या शोचा खूप आनंद घेतला तसेच स्पर्धकांच्या गायनाचे कौतुक देखील केले होते. आता एका मुलाखतीत कुमार सानू यांनी या शोचे समर्थन केले आहे.

कुमार सानू यांनी मुलाखतीत सांगितले की, “सगळ्यात मोठी गोष्ट म्हणजे अमित कुमार हे किशोर कुमार यांचे सुपुत्र आहेत. ज्यांना मी माझ्या आयुष्यात फॉलो केले आहे. ते माझे खूप चांगले मित्र आहेत. मी त्यांचा खूप आदर करतो. ते माझ्या आधीपासून गाणे गात आहेत. मला असे वाटते त्यांनी जे काही वक्तव्य केले आहे, तो त्यांचा वैयक्तिक विचार असावा. परंतु मी जेव्हा या शोमध्ये गेलो, तेव्हा मला असे काहीच दिसले नाही. असंही होऊ शकते की, जेव्हा ते या शोमध्ये गेले असतील, तेव्हा त्यांना गाणी आवडली नसतील.”

कुमार सानू यांनी सांगितले की, “आमच्या एपिसोडमध्ये काहीच स्क्रिप्टेड नव्हते. कदाचित त्यांना यामुळे गाणी आवडली नसतील कारण स्पर्धकांनी यांच्या वडिलांची गाणी गायली होती. एका वेळी आम्हाला देखील खूप प्रेम आणि सन्मान मिळाला. पण आम्ही आज देखील परिपूर्ण गायक नाहीत. आम्ही आजही चुका करतो. कदाचित स्पर्धकांनी काहीतरी चूका केल्या असतील, ज्या अमित यांना आवडल्या नसतील.”

“किशोर दा यांची गायिकी एका वेगळ्या स्तरावरील आहे. त्यांच्या स्तरावर पोहोचून गाणे खूप अवघड आहे. परंतु त्या गाण्याला समजणे आणि गाणे हे केवळ एक एक्स्पर्ट गायक करू शकतो. परंतु कोणीच 100% नाही करू शकत. त्या गाण्याला 60 ते 80 % गायले तरी देखील खूप आहे. मला माहित नाही की, अमितजी आले होते, तेव्हा एपिसोडमध्ये नक्की काय झाले होते. त्यामुळे मी त्याबद्दल काहीच बोलू शकत नाही. असंही होऊ शकते की, त्यावेळेस काहीतरी वेगळे झाले असेल म्हणून ते नाराज असतील. मी त्यांच्याशी असहमत नाही होऊ शकत कारण की त्यांचा खूप आदर करतो. पण मी त्यांना सहमती देखील दर्शवू नाही शकत. मला विश्वास आहे की, स्पर्धकांनी खूप चांगले गायले असेल,” असे पुढे त्यांनी सांगितले.

अशाप्रकारे कुमार सानू यांनी त्यांच्या मुलाखतीत या शोबाबत आपले मत व्यक्त केले होते.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…


Leave A Reply

Your email address will not be published.