Monday, July 1, 2024

लता मंगेशकर यांच्या प्रकृतीबाबत महत्वाची माहिती; आता व्हेंटिलेटरची गरज नाही, मात्र…

प्रसिद्ध गायिका लता मंगेशकर (Lata Mangeshkar) यांना कोरोनाची लागण झाल्याने, त्यांना ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. गेल्या काही दिवसांपासून त्यांच्यावर आयसीयूमध्ये उपचार सुरू होते. ९२ वर्षीय लता मंगेशकर यांना कोरोना झाल्याची माहिती मिळाल्यानंतर त्यांच्या चाहत्यांमध्ये खळबळ उडाली होती. दरम्यान, लता मंगेशकर यांच्या आरोग्याचे अपडेट समोर आले आहे.

लता मंगेशकर या कोरोना संसर्गातून बऱ्या होत आहेत. ताज्या वृत्तानुसार, त्यांना दोन दिवसांपासून भरपूर आहार देण्यास सुरुवात केली आहे. यासोबतच त्यांचे व्हेंटिलेटरही काढण्यात आले आहे. मात्र, रुग्णालयातून डिस्चार्ज मिळण्यास वेळ लागणार असून, त्या आयसीयूमध्येच राहणार आहेत. त्यांना केवळ खात्रीसाठी रुग्णालयात ठेवण्यात येत आहे. त्यांच्या वयामुळे घरी परत येण्यापूर्वी त्या पूर्णपणे बऱ्या झाल्या आहेत, याची डॉक्टरांना खात्री करायची आहे. (SInger lata mangeshkar health update)

हेही वाचा :

हे देखील वाचा