छाेट्या पडद्यावरील ‘स्वयंवर: मिका दी वोटी’ हा रिऍलिटी शो आकांक्षा पुरी हिने जिंकला, त्यासोबतच तिने तिच्या आणि मिका सिंग याच्या नात्यावरही शिक्कामोर्तब केले. शोनंतर लवकरच आकांक्षा आणि मिका नात्याला एक पाऊल पुढे नेत लग्न बंधनात अडकणार हाेते. हा रिऍलिटी शो संपून तीन महिने झाले आहेत, मात्र आतापर्यंत मिका सिंग आणि आकांक्षा यांच्या लग्नाची कोणतीही बातमी समोर आलेली नाही.
माध्यमांनी या याबाबत अभिनेत्रीला विचारले असता, तिचे उत्तर होते की, “आम्ही शोमध्येच स्पष्टपणे सांगितले होते की, आम्ही अनेक वर्षांपासून फक्त मित्र आहोत आणि राहू, आम्ही कपल नाही.”
जेव्हा आकांक्षा (akanksha puri) हिला विचारण्यात आले की, या शोची संकल्पना स्वयंवर आहे, ज्यामध्ये लोक त्यांच्या जीवनसाथीचा शोध घेतात. काही महिन्यांत आम्ही आमचे नाते पुढे नेऊ असेही तुम्ही म्हणालात. यावर आकांक्षाने उत्तर दिले, “होय, स्वयंवर हा जोडीदार निवडण्याविषयी होता, म्हणून आम्ही एकमेकांना निवडले कारण आम्ही एकमेकांना फार दिवसांपासून ओळखतो. आम्ही प्रेमात किंवा प्रेमसंबंधात आहोत असे कधीच म्हटले नाही. आम्ही स्पष्ट होतो की, आम्ही जीवनसाथी शोधत आहोत. पण शोनंतरही आमच्यात काहीही बदल झालेला नाही, तरीही आम्ही मित्रांसारखेच भेटतो.”
View this post on Instagram
ते पुढे म्हणाली, ‘आम्ही एकमेकांना प्रोटेक्ट करतो आणि एकमेकांचा आदर करतो. आम्हा दोघांना वैयक्तिकरित्या आयुष्यात कटू अनुभव आले आहेत, त्यामुळे आम्हाला काेणतेही घाई नाही. आम्ही हात धरत नाही किंवा कोणत्याही पीडीएमध्ये गुंतत नाही कारण आम्हाला माहित आहे की, आम्ही कुठे उभे आहोत. याशिवाय, आम्ही आमच्या संबंधित व्यावसायिक जीवनात व्यस्त आहोत.
View this post on Instagram
याआधी आकांक्षा ‘बिग बॉस13’ फेम पारस छाब्राला डेट करत होती. पण पारस आणि माहिराची जवळीक वाढल्यानंतर आकांक्षा आणि पारस वेगळे झाले. पारस छाबरासोबत आकांक्षा पुरीचं नातं फार काळ टिकू शकलं नसलं, तरी मिका सिंगमध्ये आकांक्षा पुरीला एका जीवलग मित्र मिळाला आहे.
दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
हेही वाचा-
‘डबल एक्लएल’च्या पडद्यामागील मस्ती पाहायची आहे का? हा व्हिडिओ पाहाच
अय्याे! कॅटरिनानं ढसाढसा रडून व्यक्त केलं दु:ख; म्हणाली, ‘सर्व म्हणत हाेते मी …’