Thursday, July 18, 2024

अय्याे! कॅटरिनानं ढसाढसा रडून व्यक्त केलं दु:ख; म्हणाली, ‘सर्व म्हणत हाेते मी …’

लाेकप्रिय अभिनेत्री कॅटरिना कॅफ हिने हळूहळू बॉलिवूडमध्ये आपला ठसा उमटवला आहे. तिच्या अभिनय कौशल्यावर अनेकवेळा प्रश्न उपस्थित केले गेले, पण मेहनतीच्या जोरावर तिने आपले कौशल्य अधिक चांगले बनवले आहे. कॅटरिनामध्ये आणखी एक कौशल्य आहे, ज्यासाठी तिने खूप मेहनत घेतली ते म्हणजे ‘डान्स’. कॅटरिनाने बॉलीवूडमधील अनेक हिट गाण्यांमध्ये आपले नृत्य कौशल्य दाखवले आहे. पण एक काळ असा होता की, तिला नाचता येत नाही असं म्हटलं जात होतं.

कॅटरिना (katrina kaif) हिने अलीकडेच एका मुलाखतीत सांगितले की, “जेव्हा ती इंडस्ट्रीत आली तेव्हा बहुतेक लोक म्हणायचे की, तिला डान्स करता येत नाही.” कॅटरिनाच्या म्हणण्यानुसार, ” हे सत्य आहे की, मलाही वाटत होतं की, मी डान्स करू शकत नाही. माझे नृत्य कौशल्य कमकुवत आहे.”

कॅटरिनाने तिच्या नृत्यकौशल्याबद्दल बॉलिवूडच्या कोरिओग्राफर्सचे आभार मानले आहेत. कॅटरिना म्हणते, “बास्को ही पहिली व्यक्ती होती, ज्याला वाटले की, मी डान्स करू शकते. मला माहित नाही की, त्याने माझ्यात असे काय पाहिले. बास्कोने मला सांगितले की, मी नृत्य करू शकतो पण मला खूप मेहनत करावी लागेल. या गोष्टींमुळे मला आत्मविश्वास मिळाला आणि मी डान्सवर मेहनत घ्यायला सुरुवात केली.” कॅटरिनाच्या मते, नृत्यदिग्दर्शक फराह खाननेही तिच्या डान्समध्ये सुधारणा करण्यासाठी खूप मदत केली. ‘शीला की जवानी’मध्ये त्यांनी खूप काही शिकवलं.”

कतरिनाने आपल्या नृत्य कौशल्याने ‘चिकनी चमेली’, ‘शीला की जवानी’, ‘काला चष्मा’, ‘माशाल्लाह’, ‘कमली’, ‘टिप टिप बरसा पानी’ अशा अनेक नृत्यगाण्यांद्वारे लोकांची मने जिंकली आहेत. कॅटरिनाला जे म्हणायचे की, ती नाचू शकत नाही, त्यांच्या नाकावर टिच्चून तिनं मेहनतीच्या जोरावर सर्वांना चुकीचे सिद्ध केले आहे. कॅटरिना लवकरच ‘फोन भूत’ चित्रपटामध्ये दिसणार आहे. या चित्रपटातील गाण्यांमध्येही तिचा डान्स पाहायला मिळणार आहे.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
हेही वाचा-
कॅटरिनाने खोलली विकी कौशलची पोल, म्हणाली तो खूपच सिंपल स्वभावाचा…

बीग बॉसने दिलाओपन चॅलेंज! शिव ठाकरेची कॅप्टेन्सी हिसकावून अर्चना सांभाळणार घराची जबाबदारी…

हे देखील वाचा