‘अरे यार, जेव्हापासून मी इंडस्ट्रीत आले…’, विजयसोबतच्या रिलेशनशिपबद्दल रश्मिकाने सांगूनच टाकलं

साऊथ इंडस्ट्रीतील सुपरस्टार विजय देवरकोंडा आणि अभिनेत्री रश्मिका मंदाना हे दोघेही कारकीर्दीची शिखरावर आहेत. या दोघांचीही ऑनस्क्रीन जोडी चाहत्यांना भलतीच आवडली आहे. तसेच, त्यांची ऑफस्क्रीन जोडीही चाहत्यांना आवडते. ते दोघे जेव्हाही एकत्र दिसतात, तेव्हा चाहत्यांना भलताच आनंद होतो. अशात ते एकमेकांना डेट करत आहेत की नाहीत? हे चाहत्यांना जाणून घ्यायचे आहे. या प्रश्नावर विजयने आम्ही फक्त चांगले मित्र असल्याचे सांगितले आहे. मात्र, डेटिंगचा प्रश्न आता रश्मिकालाही विचारण्यात आला आहे. यावर ती काय म्हणाली चला जाणून घेऊया…

नुकतेच माध्यमांना दिलेल्या मुलाखतीदरम्यान रश्मिका मंदाना (Rashmika Mandanna) हिला विचारण्यात आले की, ती कोणाला डेट करत आहे? यावर रश्मिका म्हणाली की, “कधी-कधी मी अशी असते की, अरे यार… वर्षभरात मी ५-५ सिनेमात काम करते. तरीही, तुम्हाला जाणून घ्यायचे आहे की, मी कोणाला डेट करते? तुमच्या वैयक्तिक आयुष्यात काय सुरू आहे, परंतु मला माहितीये की, आम्ही कलाकार आहोत आणि सर्वांना आमच्याबाबत जाणून घ्यायचे आहे.”

रश्मिकाने पुढे सांगितले की, “मी माझ्या कारकीर्दीच्या सुरुवातीपासूनच हे पाहत आहे. मी कुणाला डेट करत आहे, किंवा मी कुणासोबत आहे. कलाकार लाईमलाईटमध्ये असतात आणि तुम्ही लोक त्याबाबत चर्चा करत असता. परंतु जेव्हा माझ्याबाबत चर्चा होते, तेव्हा मला तुम्हाला सांगायचे आहे की, तोपर्यंत कोणत्याही गोष्टी स्वत:च ठरवू नका, जोपर्यंत मी तुम्हाला सांगत नाही.”

 

View this post on Instagram

 

A post shared by Vijay Deverakonda (@thedeverakonda)

विजय आणि तिच्याबाबत विचारले असता ती म्हणाली की, “मी तो एपिसोड आणि चर्चा पाहिल्या आहेत. मला ते सर्व खूप चांगले वाटले. मात्र, मला हेही वाटले की, हे फक्त चर्चा आहेत. मला वाटत नाही की, हे असे काही आहे, ज्यामुळे तुम्ही लग्न केले पाहिजे. हो ठीक आहे, लोकांना या चर्चा करून मजा येते, ती मजा त्यांना घेऊ द्या.”

रश्मिकाने विजयसोबतचे तिचे नाते मान्यही केले नाही आणि त्यांच्यात काही नसल्याचेही सांगितले नाही.

दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सऍप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

दैनिक बोंबाबोंबचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

अधिक वाचा-
चित्रपटाच्या पात्रावर प्रश्नचिन्ह उपास्थित करणाऱ्यांना जान्हवीने दिले सडेतोड उत्तर; म्हणाली…
‘कबीर सिंग’च्या थप्पड सीनवर कियारा अडवाणीचे वक्तव्य; म्हणाली, ‘तुम्ही जेव्हा प्रेमात असता तेव्हा…’
‘इंडियन पोलिस फोर्स’ वेब सीरीजमध्ये दिसणार सिद्धार्थ मल्होत्राचा डॅशिंग लूक, फोटो शेअर करत वाढवली चाहत्यांची उत्सुकता