Thursday, June 13, 2024

नव्या नवेली नंदा मुंबई विमानतळावर दिसली रुमर्ड बाॅयफ्रेंडसाेबत; चाहते म्हणाले, ‘नजर ना लगे…’

अमिताभ बच्चन यांची नात नव्या नवेली नंदा आणि सिद्धांत चतुर्वेदी यांच्यात डेटिंगच्या बातम्या बऱ्याच दिवसांपासून व्हायरल होत आहेत. मात्र, या दोघांनीही याबाबत अधिकृत माहिती दिली नाही. अशात नुकतेच हे जाेडपे गोव्याहून परतताना मुंबई विमानतळावर एकत्र दिसले, ज्याचा व्हिडिओ तुफान व्हायरल हाेत असून चाहते त्यावर भन्नाट कमेंट करत आहेत. काय म्हणाले चाहते? चला, जाणून घेऊया…

सिद्धांत आणि नव्याच्या व्हिडिओला पॅपराझींने कॅप्शन दिले की, “गोव्याहून आल्यावर सिद्धांत चतुर्वेदी (siddhant chaturvedi) आणि नव्या नंदा (navya nanda) यांचा एकत्र पहिला क्लिक.” विमानतळाच्या बाहेर दाेघेही साेबत निघताना दिसले. यावेळी दाेघांनी ट्विनीग केले असून पांढरे कपडे घातले हाेते.

 

View this post on Instagram

 

A post shared by Manav Manglani (@manav.manglani)

या वर्षाच्या सुरुवातीला पॅपराझींने मुंबईतील एका फॅशन शोमध्ये नव्याला सिद्धांतच्या पालकांसोबत बसलेले पाहिले. यानंतर चित्रपट निर्माते अमृतपाल सिंग बिंद्रा यांच्या वाढदिवसाच्या पार्टीतही त्या दाेघांना एकत्र स्पाॅट केले. अशात जेव्हा हे दाेघेही एकमेकांच्या पोस्टवर कमेंट करताना दिसले, तेव्हा त्यांच्या डेटिंगच्या बातम्या आणखीनच रंगू लागल्या.

 

View this post on Instagram

 

A post shared by IVM Podcasts (@ivmpodcasts)

श्वेता नंदा यांची मुलगी आणि अमिताभ बच्चन यांची नात नव्याने तिच्या आई आणि आजीसोबत ‘व्हॉट द हेल नव्या’ नावाचे पॉडकास्ट होस्ट केले आहे, ज्याल प्रेक्षकांची चांगली पसंती मिळाली हाेती. नव्याला एक भाऊ अगस्त्य नंदा देखील आहे, जो शाहरुख खानची मुलगी सुहाना खान आणि श्रीदेवीची मुलगी जान्हवी कपूरसोबत या वर्षी झोया अख्तरच्या ‘द आर्चीज’मधून बॉलिवूडमध्ये पदार्पण करेल.(bollywood navya nanda spotted with rumored boyfriend siddhant chaturvedi at mumbai airport couple has returned from goa vacation )

दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
वाढदिवस विशेष : बॉलिवूडचा कॉमेडी किंग विजय राजचा, असा आहे थक्क करणारा प्रवास

BIRTHDAY SPECIAL | रंभाने अभिनय सोडून केले होते लग्न, घटस्फोट आणि आत्महत्येच्या बातम्यांनी वेधले होते लक्ष

हे देखील वाचा