सध्या सोशल मीडियावर नेहा कक्कर आणि फाल्गुनी पाठक या दोघी गायिका खूप चर्चेत आहेत. ‘मैंने पायल है छनकाई‘ या गाण्यासाठी नेहा कक्करला खूप ट्रोल केले जात आहे. मात्र, अनेक जण नेहा कक्करच्या समर्थनार्थ बोलत आहेत. दरम्यान, भोजपुरी अभिनेत्रीनेही तिचा डान्स व्हिडिओ शेअर केला आहे. हा व्हिडिओ साेशल मीडियावर प्रचंड व्हायरल हाेत आहे.
भोजपुरी अभिनेत्री झोया खान (Zoya khan) तिच्या सौंदर्या व्यतिरिक्त नृत्यासाठीही ओळखली जाते. झोया खान अनेकदा सोशल मीडियावर डान्सचे व्हिडिओ शेअर करत असते. अलीकडेच, अभिनेत्रीने नेहा कक्करच्या ‘मैने पायल है छनकाई’ या गाण्यावर धमाकेदार डान्स केला आहे. नेहा कक्करच्या गाण्यावर तिने अशा पद्धतीने डान्स केला की, तिने सगळ्यांनाच वेड लावले आहे.
जीन्स-टॉप परिधान करुन आणि डाेक्यावर कॅप घालून झाेया पूर्णपणे नृत्यात मग्न दिसत आहे. अभिनेत्री डान्स करताना पूर्णपणे मग्न झाली आहे. डान्स व्हिडिओ शेअर करताना अभिनेत्री लिहिले की, “तू माझ्या श्वासात आहेस.” झोयाचा व्हिडिओ पाहिल्यानंतर चाहते तिच्यावर प्रेमाचा वर्षाव करत आहेत. काहींनी तिला ‘क्यूट’ म्हटले, तर काहीजण तिला ‘फायर’ म्हणत आहेत.
View this post on Instagram
नेहा कक्करच्या गाण्यावरून इतका वाद होईल असे कधीच वाटले नव्हते. काही दिवसांपूर्वीच नेहाने 90 च्या दशकातील ‘मैने पायल है छनकाई’ या आयकॉनिक गाण्याचे रिमिक्स रिलीज केले होते. फाल्गुनी पाठकनेही या गाण्यावर प्रतिक्रिया देत नेहाच्या गाण्याला ‘बकवास’ म्हटले हाेते.फाल्गुनी पाठकने, तर गाणे ऐकून उलट्या झाल्याचे सांगितले. दुसरीकडे, नेहा कक्कर फाल्गुनी पाठकला प्रतीउत्तर देत म्हणाली की, “तिने लहान वयात खूप काही मिळवले आहे. ती देवाची खास मुल आहे. आयुष्यातील या यशाबद्दल तिने तिच्या चाहत्यांचे आणि देवाचे आभार मानले.”
‘ओ सजना’ हे गाणे 9 सप्टेंबर रोजी नेहाने प्रदर्शित केले. या गाण्यात नेहासोबत क्रिकेटपटू युजवेंद्र चहलची पत्नी धनश्री वर्मा आणि प्रियांक शर्मा मुख्य भूमिकेत आहेत. या गाण्याला तनिष्क बागचीने म्यूझिक दिले आहे.
दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
बाबो! ‘रावणा’ने हेमा मालिनीच्या कानाखाली वाजवलेल्या 20 चापटा, कारण जाणून तुम्हालाही बसेल धक्का
प्रख्यात गायक उदित नारायण यांना हार्ट अटॅक, प्रकृती अत्यंत गंभीर! जाणून घ्या व्हायरल मेसेजमागील सत्य










