Saturday, June 29, 2024

नेहा कक्कर आहे गरोदर? ‘बिग बॉस ओटीटी’मध्ये देणार गोड बातमी

संगीत सृष्टीमध्ये आपल्या मधुर आवाजाच्या जोरावर नेहा कक्करने यशाचे शिखर गाठले आहे. नेहा तिच्या रोमँटिक गाण्यांनी तरुणाईच्या मनात घर करत आहे. तसेच नेहा कायम सोशल मीडियावर सक्रिय असते. तिच्या वेगवेगळ्या लूकने आणि हटके तसेच मनाला स्पर्श करणाऱ्या गाण्यांनी तरुणाईला भुरळ घातली आहे. अशात अभिनेत्री लवकरच ‘बिग बॉस ओटीटी’मध्ये झळकणार असल्याच्या चर्चा सुरू आहेत.

नेहाचं नुकतंच एक गाणं प्रेक्षकांच्या भेटीला आले आहे. त्याच्या प्रमोशनसाठी ती भाऊ टोनी कक्करबरोबर बिग बॉसच्या घरात प्रवेश करणार असल्याचं म्हटलं जात आहे. तसेच विश्वसनीय सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार नेहा बिग बॉसमध्ये आल्यावर एक मोठा खुलासा करणार आहे. हा खुलासा तिच्या खासगी आयुष्याशी संबंधित आहे. त्यामुळे तिच्या अनेक चाहत्यांना ती गरोदर असल्याचं वाटत आहे. नेहाकडे काही तरी गोड बातमी आहे, यामुळे तिच्या चाहत्यांचा आनंद गगनात मावेनासा झाला आहे. बिग बॉसच्या घरात करण जोहर बरोबर ‘संडे का वार’मध्ये ती आपल्या नवीन गाण्याचे प्रमोशन करणार आहे. त्यासह ती आपल्या आयुष्यातील एक गोड बातमी देणार असल्याने सोशल मीडियावर देखील याविषयी बरीच चर्चा रंगू लागली आहे.

साल २०२० मध्ये नेहाने रोहनप्रीत सिंगबरोबर विवाह केला. ते दोघेही एकमेकांवर जीवापाड प्रेम करतात. काही महिन्यांपूर्वी तिने तिच्या पतीबरोबर ‘ख्याल रख्या कर’ हे गाणे केले होते. यामध्ये ती एका बाळाची आई होणार, असे दाखवण्यात आले होते. त्या दोघांची प्रेम कहाणी आणि या गाण्याला प्रेक्षकांनी चांगलेच डोक्यावर घेतले होते. या दरम्यान तिचे सोशल मीडियावर अनेक स्टायलिश फोटो व्हायरल झाले होते. त्यानंतर समजले की, तिचा हा लूक ‘ख्याल रख्या कर’ या गाण्यासाठीचा आहे. सध्या तिचे सर्व चाहते बिग बॉसमधील तिचा एपिसोड पाहण्यासाठी उत्सुक आहेत.

कौटुंबिक हिंसाचारप्रकरणी वादाच्या भोवऱ्यात अडकलेला स्टार यो यो हनी सिंग आणि टोनी कक्कर बरोबर नेहाने ‘कांटा लगा’ हे गाणं केलं आहे. हे गाणं बुधवारी ‘देसी म्युजिक फॅक्टरी’ या यूट्यूब चॅनेलवर प्रदर्शित करण्यात आलं. यामध्ये हनी, टोनी आणि नेहाचा दमदार परफॉर्मन्स पाहायला मिळाला. तिघेही हटके आणि स्टायलिश अंदाजामध्ये झळकले. याच गाण्याच्या प्रमोशनसाठी नेहा बिग बॉसच्या घरात ‘संडे का वार’मध्ये येणार आहे. हे गाणं २ सप्टेंबर रोजी प्रदर्शित होणार होतं. परंतु अभिनेता सिद्धार्थ शुक्लाच्या निधनामुळे हे गाणे, तेव्हा प्रदर्शित केले नाही. तसेच हे गाणे ८ सप्टेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला आले.

दैनिक बोंबाबोंचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-‘लक्ष वेधण्यासाठी कपडे काढणे, हा माझा अजेंडा नाही’, म्हणत निया शर्माने ट्रोलिंगवर सोडले मौन

-कुरकुरीत पकोडे पाहून शिल्पाच्या तोंडाला सुटले पाणी, एकटीनेच केले फस्त; थ्रोबॅक व्हिडिओ भन्नाट व्हायरल

-सुपरस्टार नागार्जुन यांची सून समंथाने फ्लॉन्ट केले ऍब्ज; पाहून तुम्हीही घालाल तोंडात बोटे

हे देखील वाचा